Singham Again धमाका करण्यास तयार, 3 ऑक्टोंबरला करणार ट्रेलर रिलीज

Published : Sep 28, 2024, 02:01 PM ISTUpdated : Sep 28, 2024, 02:03 PM IST
singham again release date change

सार

Singham Again Trailer Release Date : रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. सिनेमाचा ट्रेलर येत्या 3 ऑक्टोंबरला प्रदर्शित केला जाणार आहे.

Singham Again Trailer : अजय देवगण स्टारर ‘सिंघम अगेन’ सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. रोहित शेट्टीने (Rohit Shetty) दिग्दर्शन केलेला सिंघम अगेनची प्रेक्षकांची आवर्जुन वाट पाहिली जात आहे. या सिनेमात अजय देवगण डीसीपी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत पुन्हा एकदा झळकणार आहे. सिनेमात तगडी स्टारकास्टही आहे.

कधी रिलीज होणार सिनेमा?
धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्स असणारा सिंघम अगेन सिनेमा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ताज्या अपडेट्सनुसार, सिंघम अगेन सिनेमाचा ट्रेलर येत्या 3 ऑक्टोंबरला रिलीज केला जाणार आहे. प्रोजेक्ट्संबंधित सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, बहुप्रतिक्षीत ट्रेलरची तारीख ठरवण्यात आल्याचे सांगितले होते.

‘सिंघम’ सिनेमातील स्टारकास्ट

रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये अजय देवगण पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत असणार आहे. याआधी वर्ष 2011 मध्ये ‘सिंघम’ सिनेमा रिलीज करण्यात आला होता. यामध्ये अजय देवगण, प्रकाश राज आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत झळकले होते. सिंघम सिनेमा तमिळ भाषेतील 'सूर्या' सिनेमाचा रिमेक आहे.

‘सिंघम रिटर्न्स’ स्टारकास्ट
यानंतर वर्ष 2014 मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर मुख्य भूमिकेत झळकले होते. वर्ष 2018 मध्ये ‘सिम्बा’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात रणवीर सिंहची धमाकेदार एन्ट्री झाली होती.

वर्ष 2021 मध्ये रिलीज झालेला ‘सुर्यवंशी’ सिनेमात अक्षय कुमार कॉप युनिव्हर्समध्ये सहभागी झाला. आता रिलीज होणाऱ्या ‘सिंघम अगेन’ सिनेमात अजय देवगणसोबत रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

आणखी वाचा : 

रणबीर कपूर शाळेतील शिक्षकासोबत घाणेरडे कृत्य करताना पकडला गेला, नंतर झाले असे

Jr NTR च्या Devra सिनेमाची पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई, पाहा कलेक्शन

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!