गायिका कार्तिकीने आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा केला. याचेच काही फोटो तिने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रिशांकच्या पहिल्या वाढदिवसाला जय्यत तयारी करण्यात आली होती. याशिवाय वाढदिवसानिमित्त हटके डेकोरेशनही केले होते.
कार्तिकीने रिशांकचे औक्षण करत सर्व मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण घालवले.
कार्तिकीने तिचा नवरा आणि मुलासोबत मॅच होणारे ऑफ व्हाइट रंगातील आउटफिट्स ट्राय केलेत.
कार्तिकीने परिवारासोबत फोटो काढत मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत.
रिशांकच्या वाढदिवसाला कार्तिकीच्या मित्रपरिवाराने उपस्थिती लावली होती.
Chanda Mandavkar