
गायिका ध्वनी भानुशालीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठं पाऊल उचललं असून, तिने यश भानुशालीसोबत साखरपुडा केला आहे. इन्स्टाग्रामवर चार सुंदर फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. या फोटोंमधून चाहत्यांना त्यांच्या या खास क्षणांची झलक पाहायला मिळत असून ध्वनीने तिची साखरपुड्याची अंगठीही फ्लॉन्ट केली आहे.
सनसेट व्ह्यू आणि रोमँटिक फोटो
या फोटोंसोबत ध्वनीने एक गोड कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलंय, "मला माझा आयुष्यभराचा कपकेक मिळाला. मी होकार दिला (sic)." या फोटोंमध्ये दोघांमधलं प्रेम स्पष्ट दिसत आहे. एका फोटोत यश तिच्या गालावर किस करताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत ध्वनी सुंदर सूर्यास्ताच्या बॅकग्राउंडवर आपली अंगठी दाखवत आहे. या खास दिवसासाठी तिने ब्राऊन टँक टॉप, लेदर स्कर्ट आणि मॅचिंग फूटवेअर कॅरी केले होते. तर यशने पांढरा शर्ट, रंगीबेरंगी जॅकेट आणि डेनिम जीन्स घातली होती.
ध्वनी भानुशालीचा म्युझिक इंडस्ट्रीतील प्रवास
वास्ते, लेजा रे आणि दिलबर यांसारख्या सुपरहिट गाण्यांमधून ध्वनीने भारतीय संगीतसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिने लुका छुपी चित्रपटातील 'दुनिया' आणि 'नयन' या गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे. तिला खरी प्रसिद्धी 'वास्ते' गाण्यामुळे मिळाली, ज्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले. इंडियाटुडे.इन ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिने पॉप म्युझिक आणि प्लेबॅक सिंगिंगबद्दलचं तिचं प्रेम व्यक्त केलं होतं. ती म्हणाली होती की, तिला स्वतःची कहाणी सांगणारी गाणी गाायला जास्त आवडतात. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे ७.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.