Scary Picture : राणा डग्गुबती आणि कंगना रनौतचा नवा हॉरर सिनेमा 'स्कॅरी पिक्चर'

Published : Nov 13, 2026, 04:19 PM IST
Kangana Ranaut in 'Scary Picture' (Photo/ANI/Instagram@sureshproductions)

सार

अभिनेता-निर्माता राणा डग्गुबतीने 'स्कॅरी पिक्चर' या नव्या हॉरर सिनेमाची घोषणा केली आहे. यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत असून, रवी बाबू याचं दिग्दर्शन करणार आहेत. सुरेश प्रॉडक्शन्सच्या या चित्रपटामुळे हॉरर विश्वात नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहे.

मुंबई : अभिनेता आणि निर्माता राणा डग्गुबतीने 'स्कॅरी पिक्चर' या नव्या हॉरर सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुरेश प्रॉडक्शन्सचे दिग्गज निर्माते सुरेश बाबू या सिनेमाची निर्मिती करत असून, ते आता हॉरर प्रकारातील चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

हॉरर जॉनरबद्दल बोलताना राणा डग्गुबतीने सांगितलं, “स्कॅरी पिक्चरपासून आम्हाला असा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे, जिथे हॉरर सिनेमांवर प्रेम करणाऱ्या दिग्दर्शकांना हक्काची संधी मिळेल. भारतात प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता आहे, तशीच ती भीती आणि हॉरर कथांमध्येही आहे. प्रत्येक भागातील लोकांच्या भीती वेगळ्या आहेत, त्यांच्या कथा वेगळ्या आहेत. आम्ही सर्व प्रकारच्या कथांना- जसे की सायकॉलॉजिकल, क्रिएचर, हॉरर-कॉमेडी किंवा सोशल हॉरर, संधी देण्यास तयार आहोत," अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक रवी बाबू 'स्कॅरी पिक्चर'मधून हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. रवी बाबू यांनी याआधी 'अनसूया' आणि 'अवुणू' यांसारखे लोकप्रिय तेलुगू हॉरर सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. भारतात हॉरर सिनेमांसाठी एक भक्कम व्यासपीठ निर्माण करण्याच्या राणा डग्गुबतीच्या स्वप्नातील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. सिनेमाची नेमकी कथा, कंगनाची भूमिका आणि इतर स्टारकास्टबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. हा सिनेमा २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kareena Kapoor Bedtime Secret : रात्री 10 नंतर करिना गप्प का होते? सैफ अली खानने सांगितलं पत्नीचं सीक्रेट
Jayanta Mukherjee: मौसमी चटर्जी यांचे पती जयंत मुखर्जी यांचे निधन