शर्वरीचा बीचवर जबरदस्त वर्कआउट!

Published : Feb 11, 2025, 09:28 AM IST
Sharvari-Wagh-tire-flip-workout

सार

शर्वरीने समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप करताना तिच्या फिटनेसचे दर्शन घडवले आहे. 'मुंज्या' आणि 'महाराज' या चित्रपटांतील यशानंतर, ती आता आलिया भट्टसोबत 'अल्फा' चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या शोधांपैकी एक, शर्वरीने पुन्हा एकदा तिच्या तगड्या फिटनेसने इंटरनेटवर आग लावली आहे. ती नेहमीच आपल्या जबरदस्त मंडे मोटिवेशन पोस्टसाठी ओळखली जाते, आणि यावेळी तिने समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप करत आपल्या फिटनेस लेव्हलचं वेगळंच प्रदर्शन केलं आहे. वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या एक्शन पटाच्या पुढील शेड्यूलपूर्वी ती स्वतःला जबरदस्तरीत्या तयार करत आहे.

२०२४ हे वर्ष संपूर्णतः शर्वरीसाठी जबरदस्त राहिले आहे. बॉलिवूडच्या यादीत ती आता टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे! मुंज्या या १०० कोटींच्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली, ज्यामधील तरस हे गाणं संपूर्ण ग्लोबल हिट ठरलं. त्याशिवाय महाराज या ओटीटी ब्लॉकबस्टर ने आणि ऍक्शन-थ्रिलर वेदामधील तिच्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

तिच्या नवीन मंडे मोटिवेशन इमेजेसमध्ये, शर्वरीने समुद्रकिनाऱ्यावर टायर फ्लिप वर्कआउट करताना तिच्या मजबूत आणि फिट शरीरयष्टीचे प्रदर्शन केले आहे. तिच्या सिक्स-पॅक अॅब्स आणि टोंड बॉडीमुळे चाहत्यांची घसे कोरडी पडली आहेत!

तिने या पोस्टसाठी भन्नाट कॅप्शन दिली – "चांगल्या बीच वर्कआउटला कधीच कंटाळा येत नाही 🌊🛞" #मंडे मोटिवेशन

 

 

शर्वरीच्या आगामी अल्फा या चित्रपटात ती बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्ट सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. द रेलवे मेन फेम शिव रवैल दिग्दर्शित हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?