'मुंजा'च्या वर्षपूर्तीनिमित्त शर्वरीचं चाहत्यांना सरप्राईज!

Published : Jun 07, 2025, 03:53 PM IST
Sharvari-Wagh-support-initiative-of-The-Viksit-Bharat-at-2047

सार

१०० कोटींचा गल्ला गाठणाऱ्या 'मुंजा' सिनेमाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त अभिनेत्री शर्वरी वाघने चाहत्यांना एक अविस्मरणीय सरप्राइज दिलं. तरस गाण्याच्या निमित्ताने डान्स वर्कशॉपमध्ये अचानक पोहोचलेल्या शर्वरीने चाहत्यांसोबत नाचून हा क्षण आठवणीतला बनवला.

१०० कोटींचा गल्ला गाठणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ‘मुंजा’ या गाजलेल्या सिनेमाच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या चाहत्यांना एक गोड आणि अविस्मरणीय सरप्राइज दिलं. असा क्षण, जो आयुष्यभर आठवणीत राहील.

‘बेला’ या आपल्या खास भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या शर्वरीने, अजूनही सोशल मीडियावर तुफान गाजणाऱ्या ‘तरस’ या गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांना एक अप्रतिम भेट दिली. एका डान्स वर्कशॉपमध्ये अचानक पोहोचलेली शर्वरी, तेथील चाहत्यांसाठी अनपेक्षित धक्का ठरली. तिचं दर्शन होताच, कुणी आनंदाने ओरडलं, कुणाच्या डोळ्यांतून नकळत अश्रू आले.

 

 

फॅन्सनी तिच्याकडे ‘तरस’ गाण्याचा हुक स्टेप करण्याची विनंती केली आणि शर्वरीनेही मनापासून ते पूर्ण केलं. सगळेजण एकत्र नाचले, हसले आणि त्या गाण्याच्या आठवणींना उजाळा देत तो क्षण अनोखा बनवला.

यावेळी चाहत्यांनी शर्वरीसाठी एक खास गिफ्टही आणलं होतं. एक भावनिक भेट, जी ‘मुंजा’ त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करत होती. नंतर झालेलं फोटो सेशन आणि एकत्र केलेले हास्याचे क्षण या भेटीला अधिक खास बनवून गेले.

शर्वरीने या प्रसंगी आपल्या भावना उघड करत सांगितलं

“‘मुंजा’ रिलीज होऊन वर्ष झालंय, यावर अजूनही विश्वास बसत नाही. ‘बेला’ सारखी भूमिका करणं माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक होतं, पण ‘तरस’ गाण्याला जे प्रेम मिळालं, ते खरंच विलक्षण होतं. एक नवोदित अभिनेत्री म्हणून मला इतक्या मोठ्या स्केलचं डान्स सॉंग मिळणं, तेही दिनेश विजन सरांसारख्या दिग्गज प्रोड्यूसरकडून हे माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं.”

ती पुढे म्हणाली

“मी लहानपणापासून मुंजाच्या कथा ऐकत आले. जेव्हा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा त्यातील कल्पनाशक्ती आणि बारकावे पाहून थक्क झाले. भारताचं पहिलं CGI पात्र म्हणजे मुंजा कोणताही व्हिज्युअल रेफरन्स नसताना आम्ही संपूर्ण कल्पनेच्या आधारे काम केलं. एक मराठी लोककथा एका भव्य हिंदी सिनेमाच्या स्वरूपात पाहणं, आणि आदित्य सरपोतदार सरांसारखा निर्देशक मिळणं, हे खरंच एक सुवर्णसंधी होती.”

शेवटी त्या खास दिवसाच्या आठवणी शेअर करत शर्वरीने सांगितलं

“मुंजाने १०० कोटींचा टप्पा गाठला आणि आजही त्याचं कौतुक होतंय, हे एखाद्या स्वप्नासारखं वाटतं. आज जेव्हा मी चाहत्यांमध्ये पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते आनंदाचं हसू पाहिलं, तेव्हा मन भरून आलं. कुणीतरी मला हुक स्टेप करायला सांगितलं आणि मग मीही थांबले नाही. आम्ही नाचलो, हसलो, आणि त्यांनी मला एक गोड गिफ्ट दिलं. हे असे क्षण असतात जे मला आठवण करून देतात की मी सिनेमा का करते. आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळणं किती अनमोल आहे!”

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?