'जिहाद' चा खरा अर्थ काय? पहलगाम हल्ल्यादरम्यान शाहरुखचा Video Viral

Published : Apr 28, 2025, 09:47 AM IST
Shah Rukh Khan

सार

Shah Rukh Old Viral Video : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख जिहादचा अर्थ सांगत आहे.

Shah Rukh Old Viral Video : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रतिसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. अशातच दहशतवादी हल्ल्यावेळी ‘जिहाद’ हा शब्द फार चर्चेत येतो. यावरुनच अभिनेता शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुन जिहादचा नेमका अर्थ काय आहे हे सांगत आहे.

जिहादचा नेमका अर्थ काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख जिहादचा अर्थ सांगत आहे. यामध्ये शाहरुख म्हणतो की, "मी इस्लामिक धर्माचा आहे. मी मुस्लीम आहे. आमच्या धर्मात एक शब्द आहे जिहाद त्याचा दुरुपयोग केला जातो. जिहादचा अर्थ असा होतो की, आपल्यामधील वाईट विचारांवर विजय मिळवणे, त्यासाठी लढणे. यालाच जिहाद म्हटले जाते. पण रस्त्यावर उतरुन लोकांचा जीव घेणे याला जिहाद म्हटले जात नाही."

 

 

पहलगाममधील दहशतवादी हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या हिंदू पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव, धर्म आणि कमला वाचण्यास सांगितले. यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण देश-जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व परिस्थितीत मोदी सरकारकडूनही काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

शाहरुखच्या कामाबद्दल…
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो सिद्धार्थ आनंदचा सिनेमा किंगमध्ये झळकणार आहे. यामध्ये सुहाना पहिल्यांदाच शाहरुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुहानाने झोया अख्तरचा सिनेमा द आर्चीजमधून अभिनयाला सुरुवात केली होती. किंग सिनेमात अभिषेक बच्चन, अरशद वारसी आमि मुंज्या सिनेमातील अभिनेता अभय वर्मा देखील झळकणार आहे.

PREV

Recommended Stories

Ranveer Singh चा Dhurandhar बघून पाकिस्तानी क्रेझी, व्हिडिओमध्ये पाहा कसं केलं कौतुक!
700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?