आयुष्मान खुराना यांनी सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जनजागृती केली

Published : Feb 11, 2025, 02:25 PM IST
Ayushmann-Khurrana-collaborate-with-UNICEF

सार

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने, यूनिसेफ इंडिया आणि आयुष्मान खुराना यांनी इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. त्यांनी मुलांसोबत डिजिटल सुरक्षा या विषयावर शिक्षणात्मक खेळ खेळले आणि पालकांना मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन केले.

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने,यूनिसेफ इंडिया आणि राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर तसेच बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाने एकत्र येऊन इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

बालहक्क आणि डिजिटल कल्याणाचा जोरदार समर्थक असलेल्या आयुष्मानने यूनिसेफ इंडिया आणि PRATYeK (प्रत्येक) या बालहक्क संस्थेसोबत त्यांच्या सेंटरला भेट दिली. येथे त्याने मुलांसोबत डिजिटल सुरक्षा या विषयावर शिक्षणात्मक आणि मजेशीर खेळ खेळत इंटरनेट सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवली. इंटरनेटच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, “आजच्या काळात ५-६ वर्षांची लहान मुले ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करत आहे. अशा परिस्थितीत, इंटरनेटचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या मुलांना त्याच्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि सुरक्षित राहण्याचे उपाय शिकवणे फार आवश्यक आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त मी युनिसेफसोबत PRATYeK (प्रत्येक) संस्थेला भेट दिली आणि मुलांसोबत काही महत्त्वाच्या इंटरनेट सुरक्षा नियमांबद्दल शिकण्याची संधी मला मिळाली.”

याशिवाय, इंटरनेट सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “या सुरक्षित इंटरनेट दिनी, युनिसेफसोबत मी ऑनलाइन सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल वर्तनाबाबत जनजागृती करायची आहे. मुलांना अशा साधनांनी सक्षम करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना इंटरनेट वापरताना कुठलाही धोका वाटल्यास किंवा अडचण आल्यास ते त्याचा रिपोर्ट करू शकतील. त्यामुळे ते स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतील. पालकांनीही त्यांच्या मुलांशी मोकळ्या संवाद साधणे आवश्यक आहे, जेणेकरून इंटरनेटशी संबंधित कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास त्यांना मदत होईल. एकत्र येऊन, जबाबदारीने इंटरनेटचा वापर करून आपण या प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित आणि सर्वांसाठी उपयोगी बनवू शकतो.”

आयुष्मान खुरानाची सुरक्षित इंटरनेट दिनीची ही भेट त्याच्या बालहक्क आणि डिजिटल कल्याणाच्या प्रतिबद्धतेशी सुसंगत आहे. त्याने केलेली ही पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे आणि डिजिटल जग अधिक सुरक्षित व समावेशक करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा आणि कृतींना चालना देत आहे.

 

 

PREV

Recommended Stories

Bigg Boss Marathi Season 6 : पहिल्याच दिवशी 17 शिलेदारांची झोप उडणार, घराचे दरवाजे होणार बंद, मोठा राडा!
Bigg Boss Marathi Season 6 : नव्या जोशात, नव्या थीमसह 'नशिबाचा खेळ' सुरू, या 17 स्पर्धकांची घरात एन्ट्री!