१९४७ च्या ‘साजन’मध्ये अशोक कुमार आणि रेहानाची जोडी गाजली, ज्यात रेहाना रातोरात स्टार बनली. १९६९ च्या ‘साजन’मधून शत्रुघ्न सिन्हा यांनी पदार्पण केले आणि ते स्टार बनले. तर १९९१ चा ‘साजन’ ब्लॉकबस्टर ठरला. त्याचा फायदा सलमान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या तिघांनाही झाला. ते सर्वजण स्टारडमच्या नव्या उंचीवर पोहोचले.