Ranabaali Box Office: 'रणबाली'ची तिकीट खिडकीवर हवा! आतापर्यंत विकली गेली २० लाखांहून अधिक तिकिटे

vivek panmand   | CMS
Published : Oct 24, 2026, 05:55 PM IST
photo

सार

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'रणबाली' या ऐतिहासिक सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित हा सिनेमा १८७६-१८७८ च्या ब्रिटिश काळातील सत्य घटनांवर आधारित आहे.

भारतीय इतिहास आणि संस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या आपल्या पूर्वजांची शौर्यगाथा 'रणबाली' या सिनेमातून मांडण्यात आली आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा १६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आतापर्यंत 'रणबाली'ने जगभरात तब्बल ६६ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. तिकीट बुकिंगच्या बाबतीतही या सिनेमाने मोठी झेप घेतली आहे. 'बुक माय शो' आणि 'डिस्ट्रिक्ट' या ॲप्सवर आतापर्यंत या सिनेमाची २० लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

राहुल सांकृत्यायन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'मैत्री मूव्ही मेकर्स'च्या बॅनरखाली नवीन येरनेनी आणि वाय. रविशंकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा 'रणबाली'च्या भूमिकेत, तर रश्मिका मंदान्ना 'जयम्मा'च्या भूमिकेत दिसत आहे. रणबाली आणि जयम्मा यांच्यातील घट्ट प्रेमावर आधारित 'एंथय्या सामी' हे गाणं रिलीज झालं आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विजय देवरकोंडाचा एक वेगळाच आणि खतरनाक लूक पाहायला मिळाला, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली.

१८७६ ते १८७८ या ब्रिटिश राजवटीच्या काळात प्राण गमावलेल्या सुमारे ८० लाख भारतीयांच्या स्मृतींना हा सिनेमा आदरांजली वाहतो. त्या काळात भारतात घडलेल्या सत्य ऐतिहासिक घटनांवर हा सिनेमा बेतलेला आहे. विजय देवरकोंडा याने 'सिंगनमला बोब्बिली रणबाली' या शूर योद्ध्याची भूमिका साकारून सगळ्यांनाच थक्क केलंय. टी-सीरीजने हा पॅन-इंडिया सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या भव्य सिनेमात विजय देवरकोंडासोबत 'द ममी', 'द ममी रिटर्न्स' आणि 'ब्लड डायमंड' फेम हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोस्लू हा तगड्या खलनायकाच्या भूमिकेत आहे. त्याने सर थिओडोर हेक्टर या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?
Bigg Boss 20: ब्लँकेटखाली मसाज! रोहित शेट्टीने काढली स्काऊटओपी आणि लव्ह गिलची शाळा