कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर दिग्दर्शकाची वादग्रस्त कमेंट, नेटकऱ्यांचा संताप

Published : May 21, 2025, 06:38 PM IST
kiara advani

सार

'वॉर 2' चित्रपटाच्या ट्रेलरमधील कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वाद निर्माण झाला. नेटकऱ्यांनी या वागणुकीवर संताप व्यक्त केला असून, त्यांना 'खालच्या दर्जाची मानसिकता' असल्याची टीका केली.

'वॉर 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, अभिनेत्री कियारा अडवाणीचा पहिल्यांदाच दिसलेला बिकिनी लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. काही सेकंदांचं हे दृश्य असूनही, त्याचं प्रभावीपणे लक्ष वेधून घेणं आणि त्यावरून निर्माण झालेला वाद यामुळे ट्रेलर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

चित्रपटाच्या या ट्रेलरमधील लूकवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक आक्षेपार्ह टिप्पणी करत, पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. वर्मा यांनी आपल्या सोशल मीडियावर कियाराचा बिकिनीमधील फोटो शेअर करत एक अत्यंत वादग्रस्त आणि अश्लील कॅप्शन लिहिलं. विशेष म्हणजे त्यांनी हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांना त्या संदर्भात गोवलं, ज्यामुळे ही टिप्पणी अधिकच वादग्रस्त ठरली.

नेटकऱ्यांनी वर्माच्या या वागणुकीवर संताप व्यक्त केला असून अनेकांनी त्याला "खालच्या दर्जाची मानसिकता", "सार्वजनिक व्यासपीठावर असभ्य भाषा वापरणारा", अशी टोकाची टीका केली आहे. वाढत्या रोषानंतर वर्मा यांनी ती पोस्ट हटवली असली, तरी तिचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत.

 

 

'वॉर 2' हा 2019 मध्ये आलेल्या सुपरहिट 'वॉर' चित्रपटाचा सिक्वेल असून, याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात हृतिक रोशन, कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 475 कोटींचा गल्ला जमवला होता, त्यामुळे दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!