
अभिनेत्री राधिका आपटे हिने तिच्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने आतापर्यंत तमिळ, तेलगू, बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे वडील डॉक्टर होते. कुटुंबातील कोणाचाही अभिनय क्षेत्राशी संबंध नसताना ती या क्षेत्रात आली आणि आज तिने स्वतःच नाव मोठं केलं आहे. तिच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले पण तिने चांगला अभिनय करणं कधीही सोडलं नाही.
आज राधिकाचा वाढदिवस असून तिच्याबद्दलच्या खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. राधिका आपटेचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण झालं आहे. तिने तीच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि नाटकांमध्ये कामाला सुरुवात केली. राधिकाने 2005 मध्ये 'वाह, लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातून पदार्पण केले.
या चित्रपटात राधिकाची भूमिका छोटी होती, तिला खरी ओळख 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'शोर इन द सिटी' चित्रपटातून मिळाली. राधिकाने नेहमीच वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राधिकाने 'पॅड मॅन', 'मांझी-द माउंटन मॅन', 'अंधाधुन', 'बदलापूर', 'पार्च्ड', लई भारी सारख्या उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
२०१२ मध्ये राधिका आपटे हिने गुपचूप लग्न केलं. अभिनेत्रीने 2012 मध्ये बेनेडिक्ट टेलरशी गुपचूप लग्न केले. राधिका डान्स शिकायला लंडनला गेली होती, तिथंच तिची बेनेडिक्ट सोबत ओळख झाली, नंतर मैत्री झाली आणि त्या दोघांनी लग्न करून टाकलं. राधिकाच्या लग्नात सर्वजण मद्यधुंद असल्यामुळं एकही फोटो काढला नसल्याचं ती आवर्जून सांगते.