यावर राज निदिमोरू यांच्या पत्नी श्यामली यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 'माझ्याबद्दल विचार करणाऱ्यांना, मला पाहणाऱ्यांना, माझ्याबद्दल ऐकणाऱ्यांना, माझ्याशी बोलणाऱ्यांना, माझ्याबद्दल लिहिणाऱ्यांना, मला भेटणाऱ्यांना प्रेमाने, आशीर्वादाने माझे प्रेम पाठवत आहे' असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. दिग्दर्शकासोबतचे त्यांचे नाते चांगले असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.