सुमारे २५० कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनणार होता. सांगितले जाते की या चित्रपटात विकी कौशल औरंगजेब आणि रणवीर सिंग त्याचा भाऊ दारा शिकोहची भूमिका साकारणार होते. करीना कपूर, भूमि पेडणेकर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट आणि अनिल कपूर यांनाही या चित्रपटात कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती.