प्रिया मराठेने व्हिडिओमधून कर्करोगाचा दिला होता अंदाज, का सोडली मालिका?

Published : Sep 02, 2025, 02:00 PM IST
pavitra rishta actress priya marathe dies at age of 38 due to cancer

सार

अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्या दोन ते अडीच वर्षांपासून या आजाराशी झुंज देत होत्या. 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका सोडताना त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव मालिका सोडत असल्याचे सांगितले होते.

अभिनेत्री प्रिया मराठेच्या मृत्यूमुळे इंडस्ट्रीमध्ये सर्वांनाच धक्का बसला आहे. ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगासारख्या आजाराशी लढताना तिचा मृत्यू झाला. वयाच्या ३८ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहरे आणि अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दुःख व्यक्त केलं आहे. प्रिया ही दोन ते अडीच वर्षांपासून या आजाराशी लढत होती.

अभिनेत्रींच्या जवळच्या व्यक्तींनाच होती 

माहिती अभिनेत्रींच्या जवळच्य व्यक्तींना या आजाराची माहिती होती. 2023 मध्ये स्टार प्रवाहची ' तुझेच मी गीत गात आहे ' ही मालिका सोडताना तिने तिच्या आजारपणाविषयी भाष्य केले होते. अभिनेत्रीने या मालिकेत मोनिका हे पात्र साकारले होते. नंतर तिच्याजागी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झळकली होती. स्टार प्रवाह वाहिनीच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामधून प्रियाने मालिका सोडत असल्याची माहिती दिली होती.

व्हिडिओमध्ये आवाज थरथरत होता 

प्रिया मराठेचा व्हिडीओ बनवल्यानंतर आवाज थरथरत असल्याचं दिसून आलं आहे. प्रियाने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. प्रिया या व्हिडिओमध्ये म्हटलं की, 'नमस्कार मी प्रिया मराठे, प्रेक्षकहो तुम्ही मला "तुझेच मी गीत गात आहे" या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात. 'होतात' अशासाठी म्हणतेय, कारण की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये.

मालिका का सोडली?

अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. मोनिका हे पात्र साकारताना मला खरंच खूप मजा येत होती. हे पात्र तुम्हाला खूप आवडत होतं, तुम्ही प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते, तो वेळ अपुरा पडत होता.' तिने पुढं यावेळी बोलताना म्हटलं आहे की, 'बाकी कलाकारांच्या अ‍ॅडजस्टमेंट्स म्हणा किंवा प्रोडक्शन टीम, क्रीएटिव्ह टीम, तो रोल इतका डिमांडिंग होता की या सगळ्याच कारणांमुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय. पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका.

विश्रांती घेऊन लवकरच भेटते

माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही करणार आहे. मला खात्री आहे की, ती ही भूमिका खूप छान प्रकारे करेल. तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल. तुम्ही ही मालिका पाहतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला, एका नव्या भूमिकेत, एका नव्या मालिकेत, स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवर. तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते. मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.' व्हिडिओमधून तिने कर्करोग झाला असल्याची माहिती कोणाला कळू दिली नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?