Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यावर अजय देवगण ते अक्षय कुमारसह बॉलिवूडमध्ये संताप, दिल्यात अशा प्रतिक्रिया

Published : Apr 23, 2025, 09:59 AM ISTUpdated : Apr 23, 2025, 10:46 AM IST
Palgham Terror Attack Bollywood Reaction

सार

Pahalgam Terror Attack Reaction : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अशातच बॉलिवड कलाकारांनी दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त करत याला उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे.

Pahalgam Terror Attack Reaction : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचे प्रतिसाद देशात-जगभरातून उमटत आहेत. अशातच बॉलिवूड कलाकारांनी देखील हल्ल्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचे सडेतोड उत्तर द्यावे अशी विनंती देखील कलाकारांनी केली आहे.

अजय देवगणची प्रतिक्रिया

अजय देवगणने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे मी अतिशय दु:खी झालो आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्ती निर्दोष होत्या. हे सर्वकाही घडले आहे ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड कलाकार संतप्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, हल्ल्याची निंदा करतो. या घटनेबद्दल ऐकल्यानंकर धक्का बसला. निर्दोष व्यक्तींची अशाप्रकारे हत्या करणे क्रुरतेपेक्षा कमी नाही. त्यांच्या परिवाराप्रति प्रार्थना करतो.

संजय दत्त म्हणतो की, आपल्या लोकांना निर्दयीपणे मारण्यात आले आहे. याला माफी नाही. या दहशतवाद्यांना माहिती हवे की, आम्ही गप्प बसणार नाहीत. याचे सडेतोड उत्तर द्यावे लागेल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन करतो की, त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे.

 

याशिवाय बॉलिवूडमधील कलाकार अनुपम खेर, सोनू सूद, तुषार कपूर, रवीना टंडनसह अन्य कलाकारांनी सोशल मीडियावर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

 

 

 

 

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?