या आठवड्यातील ओटीटी रिलीज ; जाणून घ्या कोणते चित्रपट आणि वेब सिरीज

Published : Apr 24, 2024, 04:36 PM ISTUpdated : Apr 24, 2024, 04:39 PM IST
ott platform

सार

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या अनेक विविध विषय हाताळत नवीन वेब सिरीज आणि चित्रपट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत. या आधीच त्यांच्या ट्रेलरने नागरिकांना भुरळ पडली असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या अनेक विविध विषय हाताळत नवीन वेब सिरीज आणि चित्रपट विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत. या आधीच त्यांच्या ट्रेलरने नागरिकांना भुरळ पडली असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे या वेब सिरीज आणि चित्रपट केव्हा रिलीज होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. जिमी शेरगील, लारा दत्ता, अनुष्का सेन यांसह कपिल शर्माच्या शो मधील स्टार नवी स्टार जोडी यामुळे यंदाचा वीक एन्डला भरभरून मनोरंजन नागरिकांना मिळणार आहे.

नाव : रणनीती : बालाकोट अॅन्ड बियॉन्ड

रिलीज होण्याची तारीख : 24 एप्रिल 2024

कोणत्या ओटीटीवर : जिओ सिनेमा

सिरीजीमध्ये काय आणि कोणते अभिनेते ?

जिमी शेरगिल, आशुतोष राणा आणि लारा दत्ता यांची अॅक्शन, थ्रिलर वेबसीरिज 'रणनीती: बालाकोट अॅन्ड बियॉन्ड' प्रेक्षकांना 24 एप्रिलपासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. 2019 मधील बालाकोट हवाई दलावर ही सीरिज आधारित आहे.

नाव : भीमा

रिलीज होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024

कोणत्या ओटीटीवर : डिज्नी प्लस हॉटस्टार

चित्रपटात काय आणि कोण आहे अभिनेते ?

'भीमा' हा अॅक्शन, नाट्य असणारा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. एका छोट्या शहरातील मंदिरात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये गोपीचंद, प्रिया भवानी शंकर आणि मालविका शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.

नाव : क्रॅक (Crack)

रिलीज होण्याची तारीख : 26 एप्रिल 2024

कोणत्या ओटीटीवर : डिज्नी प्लस हॉटस्टार

चित्रपटात काय आणि कोण आहे अभिनेते ?

अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांची 'क्रॅक' ही सीरिज या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. मुंबईतील एका स्टंटमॅनवर आधारित हा चित्रपट आहे. 26 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

नाव : दिल दोस्ती डिलेमा

रिलीज होण्याची तारीख : 25 एप्रिल 2024

कोणत्या ओटीटीवर : प्राईम व्हिडीओ

सिरीजीमध्ये काय आणि कोणते अभिनेते ?

'दिल दोस्ती डिलेमा' ही सीरिज 25 एप्रिल 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना नाट्य पाहायला मिळणार आहे.

यांसह ब्रिगंती , डिलिव्हर मी , 'द बिग डोअर प्राईज सीझन 2' , सिटी हंटर , डेड बॉय डिटेक्टिव्हज , गुडबाय अर्थ , 'किंग फू पांडा 4' हे चित्रपट आणि वेबसीरिजदेखील या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.

PREV

Recommended Stories

अक्षय खन्नाचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा! करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' ५ चित्रपट कोणते? पाहा यादी!
Dhurandhar Banned : 300 कोटी कमावणारा धुरंधर पाकिस्तानमध्ये नव्हे तर या 6 देशांमध्ये का झाला बॅन?