Anant Ambani-Radhika Merchant Wedding : मुलाच्या लग्नासाठी वारासणीतून नीता अंबानींनी खरेदी केली साडी, साडीची किंमत किती?

Published : Jun 28, 2024, 06:53 PM ISTUpdated : Jun 28, 2024, 06:55 PM IST
nita ambani was shopping

सार

Anant Ambani, Radhika Merchant Wedding : नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी खरेदी केलेल्या साडीला तयार करण्यासाठी लागलेत 'इतके' दिवस 

Anant Ambani, Radhika Merchant Wedding : भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला बोहल्यावर चढणार आहे. राधिका मर्चंट हिच्याबरोबर सात फेरे घेऊन अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. हिंदू पद्धतीने अनंत-राधिकाच लग्न होणार आहे. १३ जुलैला शुभ आशीर्वादचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. नीता अंबानी देखील मुलाची लग्न पत्रिका घेऊन काशी विश्वानाथ मंदिरात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी वाराणसीत गंगा आरती केली. तसेच त्यांनी लाडक्या मुलाच्या लग्नासाठी साड्या देखील खरेदी केल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘अंबानी अपडेट’ या इन्स्टाग्राम पेजवर नीता अंबानींचा साड्या खरेदी करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत नीता अंबानी वेगवेगळ्या साड्या पाहताना दिसत आहेत. नीता अंबानींनी एक नव्हे तर ६० साड्या खरेदी केल्या आहेत. वाराणसी दौऱ्यावर असताना त्यांनी उशीरा रात्री एका हॉटेलमध्ये साड्यांचा स्टॉल लावला. त्यानंतर त्यांनी अनेक रंगाचा साड्या पाहिल्या. यावेळी त्यांनी स्वतःसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाख बूटी असलेली साडी खरेदी केली.

 

 

साडी व्यापारी अमरेश कुशवाहा म्हणाले, “मला नीता अंबानींच्या लोकांनी संपर्क केला होता. ज्यानंतर मी ६० साड्या घेऊन हॉटेलमध्ये पोहोचलो होतो. रात्री उशीरा नीता अंबानींनी स्वतः साड्या पाहिल्या. त्यांना लाख बूटी असलेली साडी खूप आवडली. ही साडी सोन्या-चांदीने बनवली असून लाल रंगाची आहे. तसेच मी ज्या साड्या घेऊन गेलो होतो त्या सुद्धा सर्व साड्या त्यांच्याकडेच आहेत. त्यांनी स्वतःसाठी घेतलेल्या साडीला तयार करण्यासाठी ५० ते ६० दिवस लागले होते. त्याची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे.”

आणखी वाचा :

हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार?

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!