National Film Awards 2026 : दिल्लीची 72 वर्षांची परंपरा मोडली, यंदा गुजरातमध्ये होणार पुरस्कार सोहळा!

Published : Sep 08, 2026, 12:04 PM IST
National Film Awards 2026 : दिल्लीची 72 वर्षांची परंपरा मोडली, यंदा गुजरातमध्ये होणार पुरस्कार सोहळा!

सार

यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा एका नव्या इतिहासाची नोंद करणार आहे. 72 वर्षांत पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर, गुजरातच्या एकता नगरमध्ये 22 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मुंबई : यावर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards 2026) ऐतिहासिक ठरणार आहे. विजेत्यांची यादी तर जुलैमध्येच जाहीर झाली होती. आता 22 सप्टेंबर 2026 रोजी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी एकत्र येतील, पण यासाठी त्यांना यंदा दिल्लीला जावं लागणार नाही.

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातच्या एकता नगरमध्ये होणार आहे, ज्यामुळे अनेक दशकांची परंपरा मोडली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार दिले जातील अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026: तारीख आणि ठिकाण

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर (पूर्वीचं केवडिया) येथे होणार आहे. यावर्षी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या परिसरात हा कार्यक्रम पार पडेल.

गेली अनेक वर्षं नवी दिल्लीतील विज्ञान भवन हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं पारंपरिक ठिकाण राहिलं आहे. 1954 पासून इथेच हा सोहळा आयोजित केला जातोय. फक्त 1970 मध्ये 17 वा पुरस्कार सोहळा चेन्नईमध्ये झाला होता, जो एक अपवाद होता.

सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये का?

आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की हा सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये का होतोय? 'इंडिया वीकली'च्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गुजरात दौऱ्यामुळे हा बदल करण्यात आला असावा. पण, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे हे निश्चित कारण मानलं जाऊ शकत नाही.

यावेळच्या ठिकाणाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, पुरस्कार मिळालेल्या एका सिनेमाचा आणि या जागेचा थेट संबंध आहे. आनंद एल. राय यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी - एकतेचं प्रतीक' या नॉन-फिचर चित्रपटालाही पुरस्कार मिळाला आहे आणि याच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात सोहळा होतोय.

यामी गौतम, ममूटी आणि कार्तिक आर्यन ठरले प्रमुख विजेते

18 जुलै रोजी या पुरस्कारांची घोषणा झाली होती. 'आर्टिकल 370' ला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. याच सिनेमासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 'ब्रमायुगम'साठी ममूटी आणि 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. 'अमरन'साठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तर 'कल्की 2898 एडी' हा संपूर्ण मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ठरला.

आता सगळ्यांचं लक्ष 22 सप्टेंबरकडे लागलं आहे. नवं ठिकाण, तगडी विजेत्यांची यादी आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची पार्श्वभूमी... या सगळ्यामुळे 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा या पुरस्कारांच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू करणार आहे, हे नक्की.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?