Avdhoot Gupte Song On Vidyanand Bapat : तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा... अवधूत गुप्तेंचं विद्यानंद बापटांसाठी खास गाणं

Published : Sep 07, 2026, 06:38 PM IST
Avdhoot Gupte Song On Vidyanand Bapat

सार

Avdhoot Gupte Song for Vidyanand Bapat : गायक अवधूत गुप्ते यांनी डिजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांसाठी खास गाणं तयार केलं आहे. या गाण्यातून अवधूत गुप्तेने बापट यांना सपोर्ट केला आहे.

मुंबई : गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. विद्यानंद यांनी आपला गणेशोत्सवाला विरोध नसून त्यात वाजवण्यात येणाऱ्या डीजेला विरोध असल्याचं जाहीरपणे बैठकीत सांगितलं. त्यांच्या या विरोधातील मागणीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना मारहारदेखील करण्यात आली. यानंतर अनेकजण विद्यानंद यांच्यासाठी पुढे आले आहेत. त्यांच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे. आता गायक अवधूत गुप्ते यानेही विद्यानंद यांच्यावर एक गाणं तयार करत त्यांना खुलेपणाने पाठिंबा दिला आहे. अवधूत गुप्ते यांचं हे गाणं काही वेळातच सोशल मीडियावर लोकप्रिय झालं आहे.

विद्यानंद बापट हे डिजेविरोधातील मागणीसह त्यांच्या शुद्ध, अस्खलित मराठी भाषेमुळेही चर्चेत आले आहेत. अवधूत गुप्तेने विद्यानंद यांना त्यांच्या मागणीसाठी पाठिंबा देत गाणं तयार केलं आहे. अवधूतच्या या गाण्यावर अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा.... अशा शब्दात अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद यांच्यासाठी खास गाणं लिहिलं आणि गायलंही आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गाणं शेअर करत अवधूतने विद्यानंतर यांच्यासाठी सपोर्ट करण्याचंही सांगितलं आहे. सपोर्टबापट... असा हॅशटॅश वापरत अवधूत गुप्ते यांनी हे नवंकोरं गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

काय आहे अवधूत गुप्तेची पोस्ट -

स्वच्छ विचार अन्

स्वच्छ वाणीवर

हसणाऱ्या माकडांचा

मंगला असला

पवित्र असला

तरीही देश हा दगडांचा

तुझ्या सारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा

विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा

#supportbapat #vidyanandbapatsupport #hats_off_bapat

Lyrics/Music/Voice- Avadhoot Gupte

Recorded/Mixed/Mastered By - Akshat Wadkar

#shotoniphone by -

Malhar Bhanushali

Edited By - Guru Patil

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?