बहिणीच्या कृत्यामुळे अभिनेत्री नर्गिस फाखरी संकटात. जामीन नाकारल्यामुळे पुढे काय?
रॉकस्टार, मैं तेरा हीरो, अजहर, हाउसफुल ३ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नर्गिस फाखरी सध्या आपल्या कारकिर्दीत व्यस्त आहेत. मात्र, त्यांची बहीण आलियाने एका गंभीर गुन्ह्यात अडकून आपले जीवन धोक्यात घातले आहे.
नर्गिस फाखरीची बहीण आलिया परदेशात राहते. ४३ वर्षीय आलिया ३५ वर्षीय एडवर्ड जेकब्स यांच्या प्रेमात होती. काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर आलियाला कळाले की एडवर्डचे ३३ वर्षीय अनास्तासियाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे आलियाच्या मनात संशय निर्माण झाला आणि एडवर्ड व अनास्तासियाच्या मैत्रीमुळे तिला ईर्ष्या वाटू लागली.
वाद वाढत गेल्याने आलियाने सकाळी ६.२० वाजता एडवर्डच्या घरात घुसून त्याला धमकावले आणि घरात आग लावली. झोपेत असलेले एडवर्ड आणि अनास्तासिया धूर, गॅसोलीन आणि जळाल्याने मृत्युमुखी पडले.
एडवर्डच्या आईचे म्हणणे:
माझा मुलगा आणि आलिया एक वर्षापासून वेगळे राहत होते. एडवर्डने आलियाला अनेक वेळा दूर राहण्याची विनंती केली होती, पण आलियाने त्याचे ऐकले नाही. न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना एडवर्डच्या आईने आलियाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
नर्गिस आणि तिच्या आईने आलियावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते, आलिया कधीही खून करणारी व्यक्ती नाही आणि ती नेहमी गरजूंना मदत करते. सध्या आलियाला न्यूयॉर्कच्या फौजदारी न्यायालयात हजर केले असता जिल्हा वकील मेलिंडाने जामीन नाकारला आहे.