Imran Khan Deportation : अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश, मुंबईत आंदोलनात झाला होता सहभागी

Published : Oct 15, 2026, 11:46 AM IST
Imran Khan Deportation : अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश, मुंबईत आंदोलनात झाला होता सहभागी

सार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आंदोलनात त्याला, त्याची बहीण आणि मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. इम्रान अमेरिकन नागरिक असल्यामुळे इमिग्रेशन कायद्यानुसार ही नोटीस दिल्याची चर्चा आहे.

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १० ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात झालेल्या एका आंदोलनात तो सहभागी झाला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात अनेक लोक जमा झाले होते. इम्रानही या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत त्याची चुलत बहीण झेन मेरी खान आणि त्याची पार्टनर, अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन या दोघीही होत्या. या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं होतं.

रिपोर्ट्सनुसार, इम्रानकडे भारताचं नागरिकत्व नाहीये. तरीही तो इथल्या आंदोलनात सहभागी झाला, त्यामुळेच त्याच्यावर इमिग्रेशन कायद्याच्या कलमांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे. इम्रान हा अमेरिकेचा नागरिक असल्याचं बोललं जातं. पण, त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही, या दाव्याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या या नोटीसमध्ये इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलंय.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेत आणि मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६ मध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे ६०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ऑगस्ट क्रांती मैदानात जमलेल्यांपैकी जवळपास २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आंदोलनादरम्यान इम्रान खानसोबत नेमकं काय घडलं?

१० ऑक्टोबरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इम्रानने पोलिसांच्या व्हॅन्मधूनच सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं, “बहुधा, मी एका ड्राईव्हवर चाललोय.”त्यानंतर एक व्हिडीओही समोर आला होता. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना एका पत्रकाराने त्याला आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर इम्रान म्हणाला, "माझ्या कोणत्याही मागण्या नाहीत. मी कुठल्याही संघटनेचा भाग नाहीये."

या व्हिडीओमध्ये तो पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न विचारताना दिसला. "मी काय केलंय? मला अशी धक्काबुक्की का केली जातेय?" असा सवाल त्याने पोलिसांना केला.पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप अनेक आंदोलकांनी केला आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Nana Patekar | Tukaram Mundhe | नानांच्या शेवटच्या फोनवर तुकाराम मुंढे भावुक
Jailer 2Movie Review : रजनीकांतचा स्वॅग आणि नेल्सनची कॉमेडी, प्रेक्षकांकडून कौतुक