Movies Box Office Collection Aug 10 : 'किंगडम ते महाअवतार नरसिम्हा' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विकेंडला धमाकेदार कमाई, वाचा आकडेवारी

Published : Aug 10, 2025, 10:50 AM IST

Movies Box Office Collection Aug 10 : बॉक्स ऑफिसवर किंगडम ते महाअवतार नरसिम्हा सिनेमे सध्या गाजत आहेत. अशातच या सिनेमांची विकेंडला धमाकेदार कमाई होताना दिसून येत आहे. जाणून घेऊया शनिवारी सिनेमांनी कमावलेली आकडेवारी सविस्तर…

PREV
14
Mahavatar Narsimha - महाअवतार नरसिम्हा

‘महावतार नरसिम्हा’ सिनेमाची धूम बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत आहे. या सिनेमाने अन्य सिनेमांना मागे टाकत सर्वाधिक कमाई केली आहे. अश्विन कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने शनिवारी 19.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

24
Son of Sardaar 2— सन ऑफ सरदार २

अजय देवगणच्या सन ऑफ सरदार-2 सिनेमाची शनिवारी बॉक्स ऑफिसवरील कमाई घटल्याचे दिसून आले. आठ दिवसानंतर 50 कोटींची कमाई देखील सिनेमाने केलेली नाही. sacnilk च्या रिपोर्टनुसार, सिनेमाने ९ व्या दिवशी 0.49 कोटींची कमाई केली आहे. यानुसार एकूण कमाई 34.68 कोटी रुपये झाली आहे.

34
Saiyaara - सैयारा

अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टार ‘सैयारा’ सिनेमाच्या कमाईत शनिवारी पुन्हा वाढ झाली आहे. सिनेमाने शनिवारी 3.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शुक्रवारी सिनेमाने 2 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. सिनेमाने 23 दिवसांमध्ये 314.10 कोटींची कमाई केली आहे.

44
Kingdom - किंगडम

‘महावतार नरसिम्हा’ च्या रिलीजमुळे अभिनेता विजय देवरकोंडाच्या किंगडम सिनेमाला फटका बसत असल्याचे चित्र आहे. सिनेमाने आतापर्यंत 9 दिवसांत केवळ 48.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय किंगडम सिनेमाने विकेंडला देखील दमदार कमाई केलेली नाही.

Read more Photos on

Recommended Stories