5 कोटी बजेट अन् कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क, मराठी चित्रपटाने घडवला इतिहास

Published : Jun 17, 2026, 10:52 PM IST
baipan bhari deva

सार

‘बाईपण देगा देवा’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. केवळ ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ९० कोटींची ग्रॉस कमाई करत १४२५ टक्क्यांहून अधिक परतावा मिळवला. महिलांच्या भावविश्वावर आधारित या कथेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी चांगलं यश मिळवलं आहे. त्यामध्ये आता खासकरून देऊळ बंद २ चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर बाईपण देगा देवा या चित्रपटाने तिकीटबारीवर भरघोष कमाई केली आहे. ५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला होता पण त्यानं कमाई मात्र दमदार केली आहे.

चित्रपटाने किती केली कमाई 

या चित्रपटाने छप्परफाड कमाई केल्याचं दिसून आलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७६.२८ कोटींची कमाई केली आहे. एकूण चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन हे ९० कोटी रुपये झाले. त्यामुळं चित्रपटाला जवळपास १४२५ टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे.

कथेला महिलांचा मिळाला चांगला प्रतिसाद 

या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कलाकारांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला असून त्यामुळं सगळ्या माध्यमांमधून वाहवा मिळाल्याचं दिसून आलं आहे. महिलांच्या भावविश्वाला या चित्रपटाने हात घालण्याचं काम केलं.

मराठी चित्रपटांसाठी मोठा आदर्श 

हा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांसाठी मोठा आदर्श ठरला आहे. सर्वाधिक यशस्वी झालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाचे नाव घेतलं जात आहे. आपण हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Entertainment: घटस्फोटानंतर हंसिकाचं दमदार पुनरागमन, पण सिनेमात नाही तर...
Sanchita Ugale: 'तिला खूप त्रास दिला जात होता'; वडिलांच्या दाव्याने खळबळ