
बुलढाणा : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या खात्याचा कामाचा आणि कारवाईचा जोरदार धडाका लावून ठेवलेला आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने भेसळखोर भयभयीत झाले आहेत. काहींना भेसळीचा उद्योग तात्पुर्ता स्थगित केला आहे. काहींना दुकानं तसेच गोडावून बंद केली आहेत, तर काही जण लॉबिंग करुन हे थांबवता येईल का, या तयारीत आहेत. तर गुटखा खाणारे ही धाडींसारखी वाटणारी आणीबाणी कधी मिटेल, या तयारीत आहेत.
नागरिकांमध्ये समाधानाची लाट
तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका प्रत्येक प्रकारच्या त्यांच्या खात्याशी संबंधित उद्योगात दिसून येत आहे. यात दूध, तूप, पनीर ते सौंदर्य प्रसाधनं काहीच सुटलेलं नाही. यात अनेक प्रॉडक्टमध्ये काहीच तथ्य समोर नसल्याचं येत आहे. औषधांसह काही काढांना बाजारातून काढता पाय घ्यावा लागतोय. नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये याबद्दल एक समाधानाची लाट प्रशासनाबद्दल आणि तुकाराम मुंढे यांच्याबद्दल आली आहे.
तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढा
तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक आता राजकारण्यांकडूनही होत आहे. माजी मंत्र्यांनी तर तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढा, आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना द्या अशी मागणी पत्र लिहून केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून, तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढा, आणि प्रशासनातील इतर खात्यातील अधिकाऱ्यांना द्या, अशी मागणी केली आहे.विशेष म्हणजे आपणासह सर्व विभागप्रमुखांना हे रक्त थोडं थोडं देण्यात यावं, रुग्णांना जसं बरं होण्यासाठी रक्त लागतं, तसं हे रक्त इतरांना दिलं, तर त्यांची कार्यक्षमता वाढेल.
भ्रष्टाचाराला मोठा पायबंद
यानंतर महाराष्ट्रातील कारभार सुरळीत होऊन हे राज्य सुजलाम सुफलाम होईल, असं पत्र माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना लिहिलं आहे.एकंदरीत राज्यात ज्या प्रकारे तुकाराम मुंढे धडाडीचं काम करत आहेत, भेसळखोरांना कामातून सडो की पळो करुन सोडत आहेत, यातून सर्व सामान्य लोकांमध्ये समाधानाची लाट आहे, पण खरं तर इतर अधिकाऱ्यांनीही हे पाऊल उचललं तर भ्रष्टाचाराला मोठा पायबंद बसणार आहे.