फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच एक पाऊल पुढे असते. योगा आणि फंक्शनल वर्कआऊट्सची आवड असलेली मलायका पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसाठी नवीन वर्कआऊट घेऊन आली आहे. यावेळी तिने अॅब्ससाठी खास रूटीन शेअर केलं आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन दिलं आहे – “Strong core, zero equipment – फक्त तुमची मॅट आणि हा व्यायाम.”
मलायकाचं कोअर वर्कआऊट का महत्त्वाचं?
सतत व्यायाम करून आणि आहार सांभाळूनही अनेकांना पोटाची चरबी कमी करणं कठीण जातं. मलायकाचं हे रूटीन पोटाचे स्नायू वेगवेगळ्या कोनांतून सक्रिय करतं आणि कोअर स्ट्रेंथ वाढवतं. सर्वात मोठी सोय म्हणजे यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची गरज नाही, फक्त एक योगा मॅट पुरेशी आहे.
24
मलायकाने सुचवलेले चार क्रंच प्रकार
या रूटीनमध्ये तिने पोटाच्या स्नायूंना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेन करणारे चार प्रकार दाखवले आहेत. त्यापैकी दोन येथे दिले आहेत:
१. नी-टू-एल्बो क्रंच (Knee-to-Elbow Crunch)
योगा मॅटवर सरळ झोपा.
वरचा भाग थोडा उचलत क्रंच करा आणि त्याच वेळी गुडघे छातीकडे ओढा.
कोपर पुढे नेऊन गुडघ्यांना मधोमध भिडवण्याचा प्रयत्न करा.
१२–१५ वेळा, ३ सेट करा.
फायदा: खालच्या पोटावर आणि वरच्या अॅब्सवर जोरदार परिणाम होतो.
34
२. बोट पोज क्रंच (Boat Pose Crunch)
जमिनीवर बसून शरीर आणि पाय उचलून V-आकार धरा.
हात पिंडऱ्यांच्या समांतर सरळ ठेवा.
गुडघे छातीकडे खेचा आणि नंतर परत पाय सरळ करून संतुलन ठेवा.
१२–१५ वेळा, ३ सेट करा.
फायदा: ऑब्लिक स्नायूंवर आणि कोअरच्या आतल्या स्नायूंवर काम होते.