मोठी निर्मिती संस्था, गुप्तहेर युनिव्हर्सची कथा, प्रसिद्ध कलाकार असे अनेक घटक असूनही 'वॉर २'ने अपेक्षेनुसार प्रेक्षकांना भुरळ घातली नाही. प्रदर्शित झाल्यापासून दहा दिवसांत चित्रपटाने एकूण २१४.५० कोटी रुपये कमाई केली आहे. शनिवारी सुमारे ६.२५ कोटी रुपये कमाई झाल्याची माहिती समोर आली आहे.