Madhuri Dixit Dance Video : 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने शेअर केला डान्सचा नवा व्हिडीओ, चाहते घायाळ (Watch)

Published : Oct 10, 2025, 11:17 AM IST
Madhuri Dixit Dance Video

सार

Madhuri Dixit Dance Video : बॉलिवूडच्या ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 1984 मधील ‘शराबी’ चित्रपटातील ‘इन्तेहाँ हो गई इंतजार की’ गाण्यावर माधुरीचा डान्स चाहत्यांना भुरळ घालत आहे. 

Madhuri Dixit Dance Video : बॉलिवूड विश्वातील चर्चित अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या डान्सची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. तिच्या दिलखेचक अदांमुळे लाखो चाहते तिचे चाहते आहेत. नुकताच माधुरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती भन्नाट डान्स करताना दिसते.

व्हिडिओतील गाणं आणि डान्स

1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शराबी’ चित्रपटातील ‘इन्तेहाँ हो गई इंतजार की’* या गाण्याच्या शेवटच्या कडव्यावर माधुरीने डान्स केलाय. गेल्या काही दिवसांपासून हे गाणं सोशल मीडियावर रील्ससाठी खूप लोकप्रिय होत आहे. कुशोर कुमार आणि आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.

 

 

व्हिडिओची स्टाइल आणि घरातील झलक

माधुरीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घातला आहे आणि त्यावर स्टायलिश जॅकेट देखील आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या घरातील भिंतीवर असलेलं एम.एफ. हुसेनचे पेटिंग पाहायला मिळतं, जे तिच्या चाहत्यांसाठी खास आकर्षण आहे. हुसेन हे माधुरीचे खूप मोठे फॅन होते.

चाहत्यांसह कलाकारांच्या कमेंट्स

व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या डान्सला प्रचंड कौतूक दिलं आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनाही माधुरीच्या डान्सला दाद दिली आहे. प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, सुभाष घई आणि इतर कलाकारांनी माधुरीच्या अदांवर आणि हावभावावर भरभरून कौतुक केलं. तिच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे आणि नाजूक हावभावांमुळे व्हिडिओ आणखी आकर्षक बनला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Great Indian Kapil Show 4 : कपिल शर्मा ते सुनील ग्रोव्हर, स्टार्सची फी वाचून डोळे होतील पांढरे!
हृतिकसोबत डान्सनंतर सुझानची मुलांसाठी भावनिक पोस्ट, दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसह लग्नात सहभागी!