Election Result 2024 :स्मृती इराणींची कारकीर्द संपणार का? 1 लाख मतांनी अमेठीतून पिछाडीवर

अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांचं आव्हान आहे आणि यात किशोरी लाला विजयी होताना दिसत आहे.

लोकसभा मतमोजणीत सध्या चुरशीची लढत अनेक मतदार संघात पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपच्या अनेक महत्त्वाच्या उमेदवारांची यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात ते मागे असलेले पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी या दुसऱ्यांदा या लोकसभा मतदार संघातून उभ्या आहेत. सध्या त्या एक लाख मतांनी मागे असल्याचे पाहायला मिळत आहे . त्यांच्यासमोर प्रात्यक्षी असलेले काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांचं आव्हान आहे.

विशेष म्हणजे याच जागेवरुन स्मृती ईराणी यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. पण यंदा मात्र स्मृती ईराणी या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या जागेवर स्मृती ईराणी वापसी होणं काहीस कठीण दिसत आहे. त्यामुळे आता चर्चा रंगल्या आहेत की स्मृती इराणी राजकारणातून संन्यास घेतात की पुन्हा सिने क्षेत्रात पदार्पण करतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोण आहेत किशोरी लाल शर्मा जे स्मृती इराणींना देताय टक्कर ?

किशोरीलाल शर्मा हे राहुल गांधी यांच्या जवळ असलेले व्यक्ती आहेत. राजीव गांधी यांच्या कारकिर्दीपासून त्यांच्या संबंध गांधी परिवाराशी आहे. राजीव गांधी समवेत ते अमेठीला आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यामुळे यंदा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते या उमेदविला खऱ्या अर्थाने निवडून देत आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी खासदार झाल्यापासून केएल शर्मा अमेठी आणि रायबरेली या जागांवर ग्राउंड वर्क करण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडत असत. त्यामुळे स्थानिक लोकांपर्यंत त्यांचा संपर्क दांडगा होता.

2019 मध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव :

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारुण पराभव केला होता. महाराष्ट्रातही काँग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. दरम्यान, आता 5 वर्षानंतर जनता कोणाला निवडून देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आणखी वाचा :

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखची प्रतिक्रिया...वाचा सविस्तर

देश तुमच्या बापाचा आहे का? टीव्ही अभिनेत्याने लोकसभा निवडणूक 2024 वर केले भाष्य,उमटल्या लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया.…

Share this article