बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Bollywood actress Kiara Advani) त्यांच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना आकर्षित करत असतात. पण यावेळी कियारा अडवाणी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे (social media post) ट्रोल झाल्या आहेत. कियारा अडवाणी यांनी सोनेरी टूथब्रशचा (golden toothbrush) फोटो पोस्ट केला असून त्यावर दिलेलं कॅप्शन युजर्सच्या नाराजीचं कारण ठरलं आहे.
कियारा अडवाणी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आरसा सेल्फी पोस्ट केला आहे. त्यांनी केस मोकळे सोडले असून पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्यांच्या हातात टूथब्रश आहे. तो सोनेरी रंगाचा आहे. या फोटोसोबत कियारा यांनी, 'तुम्ही सिंधी असल्याचं वेगळं सांगायची गरज नाही' अशा अर्थाचं कॅप्शन दिलं आहे. कियारा सोनेरी ब्रश धरून त्या सिंधी असल्याचं दाखवू इच्छित आहेत. कियारा यांनी चाहत्यांना त्या सिंधी असल्याचं अनोख्या पद्धतीने सिद्ध करण्याची विनंती केली आहे.
कियारा अडवाणी यांची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. कियारा काय म्हणू इच्छित आहेत, सिंधी श्रीमंत आहेत हे सिद्ध करू पाहत आहेत की कंजूस आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. इतकं दाखवू नका, पुढच्या वेळी बुडणार हे निश्चित अशी कमेंट आली आहे. मी दर तीन महिन्यांनी माझा टूथब्रश बदलतो, पण ही आयुष्यभर तोच ब्रश वापरेल, असा दुसऱ्याने टोला लगावला आहे. हातात जास्त पैसे असतील तर असं होतं असं आणखी एकाने लिहिलं आहे. माझ्या मते, तिचे दातही सोनेरी असतील असं एकाने कमेंट केलं तर, हा सोनेरी नाही, हॉटेलमधला १० रुपयांचा ब्रश आहे असा नेटकऱ्यांनी विनोद केला आहे. फोटोत सोनेरी रंगात दिसणारा नळही सोनेरी आहे का? असा प्रश्न आणखी एकाने विचारला आहे. अंबानींच्या घरातला टॉयलेटही सोनेरी आहे, फक्त ब्रशसाठी एवढा बडेजाव का? असं एका युजरने म्हटलं आहे. कितीही महाग असला तरी दात प्लास्टिकच्या ब्रशनेच घासतात, तुम्ही आता सिंधी नाही अशा अनेक कमेंट आल्या आहेत. युजर्सना अंबानी कुटुंब कोणता ब्रश वापरतं हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तीही त्यांनी कमेंटद्वारे व्यक्त केली आहे.
कियारा अडवाणीचा जन्म ३१ जुलै १९९२ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जगदीप अडवाणी आहे. त्या मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांच्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. कियारा अडवाणी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. अनुपम खेर अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे घेतलेल्या कियारा यांनी 'फगली' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कियाराच्या 'कबीर सिंग' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले. 'शेरशाह' चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियाराच्या डेटिंगच्या बातम्या चर्चेत होत्या. २ वर्षांनंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी लग्न केले. कियारा अडवाणी सध्या साउथ सुपरस्टार राम चरणसोबत 'गेम चेंजर' चित्रपटात व्यस्त आहेत.