बॉलिवूडचे ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी रश्मिका मंदानाच्या हिंदी उच्चारांवरून तिला ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. भाषेचा खोटा अहंकार बाळगणे चुकीचे आहे, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली. नेमका काय आहे हा वाद?
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आता फक्त दक्षिण भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती बॉलिवूडमध्येही बड्या स्टार्ससोबत बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे देत पॅन-इंडिया लेव्हलवर चमकत आहे. पण, बॉलिवूड सिनेमांमध्ये रश्मिका ज्या पद्धतीने हिंदी बोलते, त्यावरून सोशल मीडियावर तिला अनेकदा ट्रोल केलं जातं.
आता याच मुद्द्यावर बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी रश्मिका मंदानाची बाजू घेतली आहे. त्यांनी हिंदी भाषेचा अहंकार बाळगणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.
25
ट्रोलर्सला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर
जावेद अख्तर यांनी रश्मिकाच्या हिंदी बोलण्याची खिल्ली उडवणाऱ्यांवर 'X' (ट्विटर) वरून संताप व्यक्त केला. 'रश्मिकाच्या उच्चारांमध्ये चुका काढणाऱ्यांना जगातील सर्वात जुनी भाषा असलेल्या तमिळचे काही शब्द बोलायला सांगा, मग बघू ते कसे उच्चार करतात! भाषेचा हा खोटा आणि निराधार अहंकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही,' असं ते म्हणाले.
आपली मातृभाषा नसलेली एखादी भाषा शिकून त्यात स्वतः डबिंग करताना कलाकारांना किती अडचणी येतात, हे न समजून घेता फक्त त्यांच्या प्रादेशिक उच्चारांवरून (Accent) टीका करणं चुकीचं आहे, असं मत जावेद अख्तर यांनी ठामपणे मांडलं.
Those who have any problem with the pronounciation of Tamil actor Rashmika should be given a few lines of Tamil which is the oldest spoken language in the world and let’s see how well they pronounce Tamil . This fake and baseless linguistic superiority is not acceptable.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) October 25, 2026
35
'मी साऊथ इंडियन आहे, त्यामुळे तो टोन येणारच': रश्मिका
रश्मिका मंदाना नुकतीच 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. तिथे तिने तिच्या हिंदी उच्चारांवर होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं. 'माझ्या हिंदी बोलण्यात साऊथ इंडियन टोन येतो, असं अनेकजण म्हणतात. पण मी एक दक्षिण भारतीय मुलगी आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात तो प्रभाव (South Indian Accent) असणं अगदी स्वाभाविक आहे. त्याशिवाय मी वेगळी कशी असू शकते? याकडे एक समस्या म्हणून बघणंच चुकीचं आहे,' असं रश्मिकाने स्पष्ट केलं.
रश्मिका सध्या 'अॅनिमल', 'छावा', 'सिकंदर', 'थम्मा' यांसारख्या बहुचर्चित हिंदी सिनेमांमध्ये काम करत आहे. विशेष म्हणजे, ती स्वतःच्या सिनेमांसाठी स्वतःच डबिंग करते.
'मी माझ्या दिग्दर्शकांना नेहमी दुसऱ्या डबिंग आर्टिस्टचा पर्याय देते. पण, दिग्दर्शकांना माझा खरा आवाजच आवडतो आणि ते माझ्याकडूनच डबिंग करून घेतात,' असं ती म्हणाली.
'वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःच्या आवाजात डबिंग करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ट्रोलर्सला घाबरून मी स्वतःला कधीच एका भाषेच्या सीमेत अडकवून ठेवणार नाही; मी सर्व भाषांमध्ये काम करेन,' असा आत्मविश्वास रश्मिकाने व्यक्त केला.
55
जावेद अख्तर यांच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया
रश्मिका मंदानाची ही स्पष्ट भूमिका आणि जावेद अख्तर यांनी तिला दिलेला पाठिंबा यामुळे सोशल मीडियावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. बहुभाषिक कलाकारांना मिळायला हव्या असलेल्या आदराबाबत नेटकरी आता कौतुक करत आहेत.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.