Kavya Maran Net Worth : अनिरुद्धची होणारी पत्नी काव्या मारन किती कोटींची मालकीण आहे?

Published : Oct 25, 2026, 09:24 AM IST

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

PREV
14
काव्या मारन आणि अनिरुद्धच्या लग्नाची तारीख

आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आणि प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच लग्न करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधतील. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२६ रोजी चेन्नईत त्यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा पार पडेल. काव्या मारनचा होणारा नवरा अनिरुद्ध रविचंदर नेमका कोण आहे? त्याची एकूण संपत्ती किती आहे?

24
अनिरुद्धचा सिनेप्रवास!

अनिरुद्ध रविचंदरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९० रोजी चेन्नईत झाला. तो एक अतिशय लोकप्रिय संगीतकार, गायक आणि म्युझिक प्रोड्युसर आहे. तमिळ सिनेमातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने हिंदी आणि तेलुगू सिनेमांनाही संगीत दिले.

२०२१ मध्ये आलेल्या '३' सिनेमातील "व्हाय धिस कोलावेरी डी" या गाण्याने अनिरुद्धला जगभरात ओळख मिळवून दिली. हे गाणे भारतातच नाही तर संपूर्ण जगात सुपरहिट ठरले. यानंतर त्याने विक्रम, जेलर, लिओ आणि शाहरुख खानच्या 'जवान' सारख्या मोठ्या सिनेमांना संगीत दिले. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्याने तो सध्या साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात महागडा म्युझिक डायरेक्टर बनला आहे.

34
अनिरुद्धची एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्ध रविचंदरची एकूण संपत्ती जवळपास ५० कोटी रुपये आहे. सिनेमे आणि जाहिरातींमधून तो बक्कळ कमाई करतो. त्याच्या संपत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, एका सिनेमाला संगीत देण्यासाठी अनिरुद्ध ८ ते १० कोटी रुपये मानधन घेतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातो. सिनेमा, प्रोजेक्ट आणि करारावर ही रक्कम अवलंबून असते.

44
काव्या मारनची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारनकडे तब्बल १३३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सध्या ती सन टीव्ही नेटवर्कमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहते. याशिवाय ती आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद टीमची मालकीण आहे. एवढंच नाही तर, तिने SA T20 लीग आणि 'द हंड्रेड' स्पर्धेतील टीम्सचे शेअर्सही विकत घेतले आहेत.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories