उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तरीही अल्लू अर्जुनची रात्र तुरुंगात, पण का?

Published : Dec 14, 2024, 08:35 AM IST
Allu Arjun

सार

‘पुष्पा-2’ सिनेमाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. तरीही अभिनेत्याला रात्र तुरुंगात घालवावी लागली. यामागील कारण काय जाणून घेऊया....

Allu Arjun Case : ‘पुष्पा-2’ सिनेमातील अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारची (13 डिसेंबर) रात्र तुरुंगात घालवावी लागली. तेलंगणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांचा अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर केला होता. तरीही अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर पडू शकला नाही. खरंतर, पुष्पा-2 सिनेमाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंग अधिकाऱ्यांना जामीनाचे आदेश मिळण्यास उशिर झाला असे सांगितले जात आहे. यामुळे अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला तरीही तुरुंगातून बाहेर पडता आले नाही. अधिकाऱ्यांनी अभिनेत्यासाठी चंचलगुडा तुरुंगातील क्लास-1 बॅरेक निवडला होता. यामध्येच अभिनेत्याने रात्र घालवली.

शनिवारी सकाळी तुरुंगातून बाहेर

अल्लू अर्जुन शनिवारी (14 डिसेंबर) सकाळी तुरुंगातून बाहेर पडला आहे. याआधी शुक्रवारी तेलंगणा पोलीस उपायुक्त ए श्रीनिवासन यांनी म्हटले होते की, अल्लू अर्जुन शनिवारी तुरुंगातून बाहेर पडेल. अभिनेत्याला एवढ्या उशिरा तुरुंगातून बाहेर काढण्यामागील काही गोष्टींबद्दल मला माहिती नाही असेही श्रीनिवासन यांनी म्हटले.

तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाले जामीनाचे आदेश

अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी म्हटले की, जामीनाच्या आदेशाची प्रत तुरुंगाधिकाऱ्यांना आधीच मिळाली होती. वकिलांनी पुढे म्हटले की, "उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत तुरुंगातील अधीक्षकांना देण्यासह त्यामध्ये अल्लू अर्जुनला तत्काळ स्वरुपात जामीन द्यावा असे त्यामध्ये निर्देशन दिले होते. तरीही अभिनेत्याला जामीन दिला गेला नाही. आम्हाला याचे कारण माहिती नाही."

शुक्रवारी अभिनेत्याला अटक

अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर अल्लू अर्जुनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनच्या अपीलवर सुनावणी करत अंतरिम जामीन मंजूर केला होता. याशिवाय कोर्टाने सुनावणी करत म्हटले की, अल्लू अर्जुन एक अभिनेता असण्यासह त्याला खासगी आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

4 डिसेंबरच्या संध्याकाळी पुष्पा-2 सिनेमाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अल्लू अर्जुनने उपस्थिती लावली होता. हजारोंच्या संख्येने गर्दी प्रीमियरसाठी झाली होती. अशातच अल्लू अर्जुनच्या एन्ट्रीनंतर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली असता एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय महिलेच्या मुलाला गंभीर दुखापत झाली होती. याच प्रकरणात पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून अटक केली होती.

आणखी वाचा : 

अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चेंगराचेंगरी प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

Year Ender 2024: यावर्षी ही १० गाणी ठरली लोकप्रिय

 

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Salman Khan YouTube : सलमान खानची यूट्यूबवर एन्ट्री, सुरू केलं स्वतःचं चॅनेल