
दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या संपत्तीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाले आहेत. संजयची पत्नी प्रिया सचदेव आणि पूर्वीची पत्नी करिष्मा कपूर यांच्यात संपत्तीवरून झालेले वाद कोर्टात जाऊन पोहचले आहेत. करिष्माने तिच्या दोन्ही मुलांना संपत्ती मिळावी म्हणून कोर्टातल्या लढाईला सुरुवात झाली आहे.
संजय कपूरची संपत्ती तब्बल ३० हजार कोटी रुपये आहे. या इतक्या मोठ्या साम्राज्याचा मालक कोण? याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु झालं आहे. प्रिया सचदेव हिनं संजय कपूर यांचं मृत्यूपत्र कोर्टात सादर केल्यानंतर करिष्मानं कोर्टात धाव घेतली. माझ्या आणि संजयच्या मुलांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून ही केस लढत असल्याचं सांगितलं आहे.
करिष्माला तिच्यासाठी संपत्तीतील हिस्सा नकोय, असा दावा तिच्या वकिलांनी म्हटलं आहे. करिष्माला तिच्या दिवंगत पतीच्या संपत्तीमध्ये काडीमात्र रस नसल्याचं वकिलांनी म्हटलं आहे. परंतु प्रिया सचदेव यांच्या विरोधातील लढाई तिची मुले समायरा आणि कियान यांना त्यांचा वाटा मिळावा यासाठी आहे, असं करिष्मा कपूरच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
करिष्मा कपूर ही तिच्या हक्कासाठी लढाई लढत असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे. करिष्मा आणि तिच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया सचदेव यांनी मुलांना 1900 कोटी रुपये आधीच देण्यात आल्याचा दावा फेटाळला. वकिलांनी यावेळी बोलताना म्हटलं की, जर मालमत्ता 30000 कोटी रुपये असेल, तर मुलांना फक्त 1900 कोटी रुपये मिळत आहेत. संजयच्या आई, त्याची तीन मुले आणि प्रिया असे केवळ पाच कायदेशीर वारस आहेत. प्रिया जर इच्छापत्र खरे असेल तर ते उघड का करत नाही असं वकिलांनी म्हटलं आहे.