
मुंबई: संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून घरात वाद निर्माण झाले आहेत. त्यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीतील हिस्सा आपल्याला मिळावा म्हणून करिष्मा कपूरच्या मुलांनी कोर्टाचा दरवाजा वाजवला आहे. यावेळी त्यांनी संजय यांची पत्नी प्रिया सचदेव हिनं सादर केललं मृत्यूपत्र खोटं किंवा बनावट असल्याचा दावा केला होता. यावेळी आई आणि बहिणीने यांनी संपत्ती लुटल्याचा आरोप केला.
संपत्तीचा वाद सुरू असतानाच संजय कपूर यांची बहीण मंधीरा कपूर हिनं प्रिया सचदेव हिच्यावर कुटुंबियांपासून दूर ठेवल्याचा, एकटं पाडल्याचा आरोप केला आहे. यावेळी तिने करिश्माला कपूरची बाजू घेतली आहे. प्रिया सचदेव हिने कोर्टाकडे मंधीराला या सगळ्या प्रकारणांपासून लांब राहण्याची मागणी केली आहे.
कोर्टाने संजयच्या बहिणीला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. प्रिया सचदेव हिला दिलासा दिला असून मंधीरा कपूर हिला या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा आदेश दिलाय या प्रकरणातून कायदेशीररित्या तिला बाहेर काढण्यात आलं आहे. मंधीरा कपूर यांनी पक्षकार बनण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही. या प्रकरणात त्या जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत आहेत.
त्या जाणीवपूर्वक हस्तक्षेप करत असून त्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी प्रियाने कोर्टाला सांगितलं होतं. कोर्टाने प्रियाचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तिच्या नणंदेला बाहेरचा रास्ता दाखवला आहे. दिल्ली उच्च न्यायालायने बोलताना म्हटलं की, संजय कपूर मालमत्ता वादा प्रकरणी दिलेला त्यांचा आदेश दुरुस्त केला जाईल कारण त्यात मंधीरा कपूर यांच्या वकिलांची चुकीची नोंद झाली होती. मंधीरा कपूर यांनी न्यायालयात कोणतीही याचिका दाखल केली नसल्याचं निदर्शनास आणलं असता न्यायालयानं हे निर्देश दिले.