अबब, गोवर्धन असरानी यांनी पत्नीसाठी किती संपत्ती ठेवली? आकडा वाचून माराल डोक्याला हात

Published : Oct 21, 2025, 09:47 AM IST

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले आहे. 'शोले' सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या असरानी यांनी पत्नी मंजू बन्सल यांच्यासाठी ४०-५० कोटींची संपत्ती मागे ठेवली आहे. 

PREV
16
अबब, गोवर्धन असरानी यांनी पत्नीसाठी किती संपत्ती ठेवली? आकडा वाचून माराल डोक्याला हात

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक दुःखद बातमी आली आहे. या बातमीमुळे सगळीकडंच वातावरण ढवळून निघालं आहे. गोवर्धन असरानी यांचे निधन झालं असून त्यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

26
उपचारादरम्यान झालं निधन

उपचारादरम्यान गोवर्धन यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला असून त्यांच्या मृत्यूचा चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

36
पत्नीसाठी किती संपत्ती मागे ठेवली?

पत्नीसाठी त्यांनी जवळपास ४०-५० कोटी रुपये मागे ठेवले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत शोले, चुपके-चुपके, अभिमान यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या असरानी यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

46
कोणती अभिनेत्री गोवर्धन यांची पत्नी होती?

असरानी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असरानी यांची पत्नी मंजू बन्सल यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं आहे. काम करत असताना मंजू आणि असरानी यांच्यात प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

56
असरानी यांच्या कुटुंबात कोण आहे

असरानी यांचा जन्म जयपूर येथे सिंधू कुटुंबात झाला आहे. त्यांना चार बहिणी आणि तीन भाऊ आहेत. असरानी यांचा मुलगा नवीन असरानी याने चित्रपटात करिअर केलं नाही तर वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आहे. त्यांचा मुलगा डेंटिस्ट आहे.

66
कोणत्या चित्रपटातून पदार्पण केलं?

असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीतून केली. 1964 मध्ये, असरानी यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि 1966 मध्ये त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०२३ पर्यंत ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते.

Read more Photos on

Recommended Stories