Govardhan Asrani Dead: गोवर्धन यांनी निधनाआधी केली होती सोशल मीडिया पोस्ट, पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी लागेल वाहायला

Published : Oct 21, 2025, 08:46 AM IST

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. 'शोले' चित्रपटातील 'अंग्रेजों के जमाने के जेलर' या भूमिकेसाठी ते ओळखले जात होते. निधनापूर्वी त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली.

PREV
16
Govardhan Asrani Dead: गोवर्धन यांनी निधनाआधी केली होती सोशल मीडिया पोस्ट, पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी लागेल वाहायला

बॉलिवूड जगातील प्रसिद्ध अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. मागील ४ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते पण त्यांनी उपचाराला साथ दिली नाही आणि हॉस्पिटलमध्येच शेवटचा श्वास घेतला.

26
बॉलिवूड जगतावर कोसळली शोककळा

त्यांच्या जाण्यामुळे बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी केलेल्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली होती.

36
सोशल मीडियावर होते सक्रिय

गोवर्धन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते. इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर त्यांचे जवळपास सहा लाख फॉलोवर्स होते. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ते या प्लॅटफॉर्मवर शेअर करत असायचे. सुरुवातीच्या काळात काम केलेले त्यांचे काही व्हिडीओ येथे आहेत.

46
शेवटच्या पोस्टमध्ये काय होतं?

शेवटी गोवर्धन यांनी केलेली पोस्ट पाहून आपण नक्कीच भावुक व्हाल. सध्या दिवाळीचा मोसम सुरु असून त्यानिमित्त त्यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. इंस्टारग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

56
स्टोरीमध्ये काय होतं?

त्यांनी पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये प्रज्वलीत झालेले दिवे दिसत आहेत. सोबतच हॅपी दिवाळी असा एक संदेश या फोटोमध्ये देण्यात आला आहे.

66
अनेक भूमिकांच झालं कौतुक

त्यांच्या अनेक भूमिकांच कौतुक झालं असून त्यांनी शोले चित्रपटात जेलरचे निभावलेले पात्र खासकरून प्रसिद्ध झालं होतं. या पात्राला ‘अंग्रोजों के जमाने का जेलर’ अशी विशेष ओळख आहे. त्यांनी साकारलेले हे पात्र आज अजरामर झालेले आहे. असरानी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हे पात्र अमर करून टाकले आहे. त्यांनी अनेक विनोदी चित्रपटांत काम केलेले आहे.

Read more Photos on

Recommended Stories