
दहीहंडीच्या वेळेस सेलिब्रेटींना मागणी असते, यावेळी मराठी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री यांना मोठ्या प्रमाणावर बोलावलं जातं. या एका दिवसात सेलिब्रेटींना अनेक पैसे मिळत असतात. गेल्या काही वर्षात दहीहंडीच्या सणाला ग्लॅमरचा टच देण्याचा प्रयत्न केला जातो. कोण मोठा सेलिब्रेटी घेऊन कार्यक्रमाला येतो यावर दहीहंडीचे यश समजले जाते.
आठवडाभर आधी दहीहंडीची बॅनरबाजी केली जाते. गर्दी जमवण्यासाठी मंडळाकडून आयोजनावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. काही ठिकाणी केवळ सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात, तर काहीजण वेगवेगळ्या गाण्यावर परफॉर्मन्स करतानाही दिसतात. हिंदी आणि मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणावर दहीहंडीला बोलवायला मानधन दिलं जात.
एका दिवसासाठी नाही तर काही तासांसाठी हे कलाकार पैसे घेत असतात. यासाठी मराठी कलाकार २० हजारपासून काही लाखोंपर्यंत पैसे घेत असतात. या एका दिवशी मराठी कलाकार मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असतात. मराठी इंडस्ट्रीतले टॉपचे काही कलाकार चार ते पाच लाखांमध्येही मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं. तर डान्स करण्यासाठी अभिनेत्री तीन ते चार लाखांचं मानधन घेतात.
दहीहंडी उत्सवाच्या काळात बॉलिवूड सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पाच ते दहा लाख रुपये घेतात. अभिनेत्री डान्स परफॉर्मन्ससाठी तीन ते चार लाखांच्या मानधनाची मागणी करतात. तर बॉलिवूड कलाकांराच्या मानधनाचा आकडा पाच लाखांच्या वरचा आहे. हे सेलिब्रिटी तब्बल दहा-पंधरा लाख घेत असल्याचं समजतंय.