शशांक केतकरने कचऱ्यावरून व्यक्त केली नाराजी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Published : Aug 16, 2025, 01:09 PM IST
shashank ketkar

सार

मराठी अभिनेता शशांक केतकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कचऱ्याच्या समस्येवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारतातील स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त करत सर्वांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे.

मराठी अभिनेता शशांक केतकर हा कायमच त्याच्या सोशल मीडियाद्वारे प्रश्न मांडत असतो. खराब रस्ते, कचरा, खड्डे, सिग्नल आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर तो कायमच बोलत असतो. त्याच्या तक्रारींची अनेकवेळा दखल घेतली जाते. त्याने आता परत एकदा एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामधून त्यानं तक्रार केली आहे.

 

शशांकने कोणती तक्रार केली? 

शशांकने तक्रार करून कचऱ्याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यानं भारत स्वच्छ व्हावा अशी सगळ्यांकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. शशांक म्हणतो की, अनेक जणांना वाटत असेल ना... शशांक कशाला रस्त्याचे, खाद्याचे, कचऱ्याचे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो शेअर करत असतो? त्यानं काही होणार नाही. त्यानं जर भारत सुधारला तर अजून काय पाहिजे?

असं बऱ्याच जणांचं मत आहे. मला माहित आहे की जवळची मंडळी, नातेवाईक आणि शत्रू हसतात. तो पुढं म्हणतो की, मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या मनात असते पण तुमच्या मनात भीती असल्यामुळं तुम्हाला बोलता येत नाही. तो म्हणतो की, तुमच्या मनाला समाधान मिळावं आणि आपण काहीतरी या विचारानं शांत झोप लागते, असं वाटत असेल व्हिडिओकडे जरा गांभीर्याने बघा... तुम्हालासुद्धा असं जर काही करता आलं तर नक्की करा. कारण आपण आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनीच आपला भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होईल.

कचऱ्याची परिस्थिती जशीच्या तशी

 रस्त्यावरील कचऱ्याचे व्हिडीओ दाखवले असून रात्रीच्या वेळेस त्यानं रस्त्यावरील कचऱ्याची परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यानं कचऱ्याची परिस्थिती अजूनही बदलली नसल्याचा उल्लेख केला आहे. या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने कचरा टाकला जातो असं शशांकने म्हटलं आहे. शशांकने यावेळी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ranveer Singh चा Dhurandhar बघून पाकिस्तानी क्रेझी, व्हिडिओमध्ये पाहा कसं केलं कौतुक!
700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?