अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' ने दोन दिवसांत ३२ कोटींची कमाई केली आहे. याउलट, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील 'अजेय' चित्रपटाची कमाई लाखांमध्ये आहे.
Box Office Collection: 'या' प्रसिद्ध ३ चित्रपटांनी किती कमाई केली?
बॉक्स ऑफिसवर अजेय, दशावतार हे चित्रपट दाखल झाले आहेत. या चित्रपटांमधील दशावतार या चित्रपटाने चांगली कमाई केली असून दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं आहे.
24
Jolly LLB 3
अर्शद वारसी आणि अक्षय कुमार यांचा अभिनय असणारा जॉली एलएलबी ३ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.७५ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २० कोटी आणि दोन दिवसांमध्ये ३२ कोटींची कमाई केली आहे.
34
Ajey: The Untold Story of Yogi
अजेय हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित असणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २० लाखांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १५ लाखांची कमाई केली आहे.
दशावतार हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला असून त्यानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६० लाखांची कमाई केली. नंतरच्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने ५. २२ कोटींची कमाई केली. या चित्रपटाची एकूण कमाई ही कोटींच्या घरात जाऊन पोहचली आहे.