अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या करिअरच्या सुरुवातीला घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल खुलासा केला आहे. एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती आणि थरथर कापत पळून गेली होती.
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच तोंड धरलं आणि नंतर, किस्सा ऐकून म्हणाल किती ती किळसवाणी इंडस्ट्री
अभिनेत्री मौनी रॉय हिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल माहिती दिली आहे. तिला एका घटनेनं भयंकर त्रास झाला होता, त्याबद्दलचा खुलासा तिने यावेळी केला.
26
काय प्रकार घडला होता?
मौनी रॉय हिने यावेळी घडलेला प्रकार शेअर केला. त्यामध्ये तिने सांगितलं की 'मी २१-२२ वर्षांची होते. एक सीन होता, ज्यामध्ये एक मुलगी स्विमिंग पूलमध्ये पडते, बेशुद्ध होते आणि नायक तिला पुन्हा जिवंत करण्यासाठी तोंडाला तोंड लावून तिला पुन्हा जिवंत करतो.'
36
मौनीचा चेहरा धरला आणि नंतर
यावेळी त्यानं मौनीचा चेहरा धरला आणि तिला तोंडाने श्वास द्यायला लागला. त्या क्षणी, मला काय झालं ते समजलं नाही. मी थरथर कापत होते आणि खाली पळत सुटले. यामुळे मला खूप जास्त धक्का बसलेला होता'
मौनी रॉयने इंडस्ट्रीत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती डेव्हिड धवनच्या 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमात दिसणार आहे. या रोमँटिक कॉमेडीमध्ये पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका असून हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
56
मौनीने कुठून केली करिअरला सुरुवात
मौनीने तिच्या करिअरची सुरुवात ही मालिकेतून केली. तिने क्युंकी सास भी कभी बहू थी' या गाजलेल्या मालिकेतून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.
66
कोणत्या चित्रपटातून केलं पदार्पण?
तिनं २०१८ मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि नंतर 'रोमियो अकबर वॉल्टर' आणि 'मेड इन चायना' मध्ये काम केलं. 'ब्रह्मास्त्र: पार्ट वन - शिवा' सिनेमातील भूमिकेसाठीही मौनीचं कौतुक करण्यात आलं.