Bhau Kadam - Gautami Patil : गौतमी पाटील-भाऊ कदम याचं 'हिल पोरी हिला' गाणं तुफान व्हायरल, तुम्ही ऐकलं का?

Published : Jul 14, 2026, 04:56 PM IST

Bhau Kadam Gautami Patil Hil Pori Hila : भाऊ कदम आणि गौतमी पाटील यांचं हिल पोरी हिला हे गाणं रिलीज झाल्यानंतर तुफान व्हायरल झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते आहे.

PREV
17
गौतमी पाटील - भाऊ कदम

गौतमी पाटील तिच्या नव्या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात ती अभिनेते भाऊ कदम यांच्यासोबत थिरकताना दिसते आहे.

27
हिल पोरी हिला गाणं

गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांचं हिल पोरी हिला हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

37
भाऊ कदम यांचा खास अंदाज

या गाण्यातून पहिल्यांदाच भाऊ कदम आणि गौतमी पाटील ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ५ जून रोजी हे गाणं रिलीज झालं.

47
नवं गाणं सोशल मीडियावर चर्चेत

दादा कोंडके यांचं सुपरहिट गाणं हिल पोरी हिला हे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात दादा कोंडकेंप्रमाणे भाऊ कदम यांचा लूक करण्यात आला आहे.

57
हिल पोरी हिला....

हिला पोरी हिला हे नवं गाणं रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे.

67
दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती

या गाण्याला, गौतमी आणि भाऊ कदम यांच्या जोडीला प्रेक्षकांमधून अतिशय लोकप्रियता मिळते आहे.

77
सोशल मीडियावर गाण्याची क्रेझ

सोशल मीडियावर अनेकांकडून या गाण्यावर रिल्स तयार केले जात आहेत. सोशल मीडियावर हे गाणं तुफान ट्रेंड होत आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories