जॅकी श्रॉफचे नाव आणि आवाज वापरल्यास अडचणीत येऊ शकता,जाणून घ्या का ?

Published : May 19, 2024, 09:35 AM ISTUpdated : May 19, 2024, 10:26 AM IST
Jackie Shroff Name Voice Not Used

सार

जॅकी श्रॉफ यांचे नाव आणि आवाज त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही. असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जॅकीने आपल्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा अर्ज नुकताच कोर्टात दाखल केला होता. 

एंटरटेनमेंट डेस्क : जॅकी श्रॉफ यांनी अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की. त्यांचे नाव,आवाज आणि इतर गोष्टी त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्या जात आहेत. ज्यामुळे त्यांच्या सेलिब्रिटींच्या प्रतिमेला तडा जात आहे. आता यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे.कोर्टाने आदेश दिले आहेत की,अभिनेत्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याचे नाव, आवाज किंवा ओळख स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकत नाही. श्रॉफ यांनी न्यायालयात याचिका दाखल करत म्हंटले होते की, काही सोशल मीडिया एआयच्या मदतीने त्यांची ओळख वापरून खूप पैसे कमवत आहेत. याशिवाय सार्वजनिक व्यासपीठावर जॅकी, भिडू आणि जग्गू दादा यांसारख्या काही नावांचा गैरवापर केला जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

जॅकी श्रॉफ यांच्या खटल्याची सुनावणी :

जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने सुनावणी केली, ज्यामध्ये इंटरनेटवर त्यांचे नाव, प्रतिमा, उपमा, आवाज आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा गैरवापर करण्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. त्याच्या 'भिडू' आणि 'भिडू का खोपचा' या ट्रेडमार्क लाइनचे नोंदणीकृत मालक असूनही, अनेक कंपन्या जॅकी श्रॉफचे फोटो असलेले वॉल आर्ट, व्यापारी वस्तू, टी-शर्ट आणि पोस्टर्स इत्यादी विकत असल्याचे या प्रकरणात म्हटले आहे. जॅकीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की कोणत्याही सेलिब्रिटीचे नाव, प्रतिमा आणि आवाज कायद्यानुसार संरक्षित आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. एक सेलिब्रिटी असल्याने जॅकी श्रॉफ यांना त्यांच्या प्रतिमेचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. जर कोणी आपल्या नावाच्या आणि ओळखीच्या मदतीने पैसे कमवत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार अभिनेत्याला आहे. एवढेच नाही तर न्यायालयाने अनेकांना नोटिसाही बजावल्या आहेत.

जॅकी श्रॉफचा वर्क फ्रंट :

जॅकी श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूड आणि साऊथ व्यतिरिक्त इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम करत आहेत. 2023 मध्ये OTT वर स्ट्रीम झालेल्या मस्ती में रहने का या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, टू झिरो वन फोर, बेबी जॉन, सिंघम अगेन आणि बापमध्ये दिसणार आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग सध्या सुरू आहे.

आणखी वाचा :

प्रभास नव्हे या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधणार अनुष्का शेट्टी, अभिनेत्रीच्या विवाहाच्या चर्चांना उधाण

25 दिवसानंतर घरी परतले तारक मेहतामधील 'सोढी', पत्नीने दिली अशी प्रतिक्रिया

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Tusshar Kapoor Threat : टायगर श्रॉफनंतर आता तुषार कपूरला 5 कोटींच्या खंडणीची धमकी
Hanuman Ansh Movie Controversy : 450 कोटींच्या कमाईनंतर 'हनुमान अंश'च्या टीममध्ये फूट, हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये वाद