Gautami Patil Car Accident : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कारचा पुण्यातील मुंबई-बंगळूर महामार्गावर रिक्षाला धडकून अपघात झाला आहे. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील सर्वांनाच माहीत आहे. आज तिच्या कार्यक्रमांना हजारो लोक गर्दी करतात. तरुण आणि महिलांसह तिचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र, आता गौतमीच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
28
रिक्षाचालक जखमी, ड्रायव्हरला अटक
या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून रिक्षाचालक जखमी झाला आहे. गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता हा अपघात झाला.
38
अपघातात कोणतीही जीवितहानी नाही
गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशेष म्हणजे अपघाताच्या वेळी रिक्षा थांबली होती. गौतमीच्या कारने तिला जोरदार धडक दिली.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी (सप्टेंबर) सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, गौतमी पाटीलच्या गाडीला पुण्यातील मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला.
58
मागून धडकल्याने रिक्षाचे मोठे नुकसान
एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. गौतमी पाटीलच्या गाडीने मागून रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
68
अपघातावेळी गौतमी गाडीत नव्हती
अपघात लक्षात येताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीत नव्हती.
78
फरार ड्रायव्हरला पोलिसांनी केली अटक
ही माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर कारचा चालक फरार झाला होता. मात्र, सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चालकाला अटक केली आहे.
88
ड्रायव्हर दारू प्यायला होता का?
पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. अपघाताच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता की नाही, याचा तपास केला जाईल. यासाठी वैद्यकीय चाचणी केली जाईल. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होईल. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.