Fardeen Khan Career : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहजहानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता फरदीन खानच्या करिअरबद्दल आपण जाणून घेणार आहोत. फरदीन हा सुपरस्टार फिरोज खान यांचा मुलगा आहे.
'राजा शिवाजी' या चित्रपटात फरदीन खान 'शाहजहान'च्या भूमिकेत दिसतोय. सलग फ्लॉप चित्रपटामुळे त्याने काही काळ काम करणं बंद केलं होतं. आता काही वर्षांपासून फरदीनने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.
25
१२ चित्रपट फ्लॉप
फरदीन खानने १९९८ साली 'प्रेम अगन' या चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाला प्रेक्षक मिळाले नाहीत. यानंतर त्याचे जवळपास १२ चित्रपट फ्लॉप ठरले.
35
अनेक सुपरस्टार्ससोबतही काम
फरदीन खानचं नशीब खूपच खराब होतं. त्याला पदार्पणानंतर सतत चित्रपट मिळत गेले, पण एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्याने अनेक सुपरस्टार्ससोबतही काम केलं, पण त्याचाही त्याला काही फायदा झाला नाही.
फरदीन खानचे 'नो एन्ट्री' आणि 'ऑल द बेस्ट' हे चित्रपट हिट ठरले. पण, हे दोन्ही मल्टी-स्टारर चित्रपट असल्यामुळे त्याचं श्रेय त्याला मिळालं नाही. यानंतरही तो काही चित्रपटांमध्ये दिसला, पण त्याला यश मिळालं नाही. अखेर त्याला चित्रपट मिळणं बंद झालं आणि तो लाइमलाइटपासून दूर गेला.
55
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई
फ्लॉप करिअरमुळे फरदीन खान जवळपास १४ वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होता. त्याने 'हीरामंडी' या वेब सीरिजमधून कमबॅक केलं. यानंतर तो 'हाऊसफुल ५' आणि 'खेल-खेल में' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला. आता त्याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.