भाडिपाच्या सारंगने गुपचूप केलं लग्न, 'या' परदेशी मुलीसोबत लग्नगाठ बांधली

Published : Sep 30, 2025, 12:31 PM IST
sarang sathey and dev paula

सार

भाडिपाचा सहसंस्थापक आणि अभिनेता सारंग साठ्ये याने त्याची १२ वर्षांची गर्लफ्रेंड पॉलासोबत कॅनडामध्ये लग्न केले आहे. २८ सप्टेंबर रोजी एका खाजगी समारंभात ते विवाहबंधनात अडकले. 

भाडिपाचा सहसंस्थापक आणि अभिनेता सारंग साठ्ये हा कायमच चर्चेत राहत असतो. त्यांच्या युट्युब चॅनेलवर विविध प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. मराठी मनोरंजन क्षेत्रात भाडिपा एक यशस्वी प्रयोग म्हणून समोर आला आहे. याच सारंगने त्याची गर्लफ्रेंड पॉलासोबत लग्न केलं आहे. दोघेही जवळपास १२ वर्षांपासून रिलेशनमध्ये राहत होते.

अचानक लग्न करून दिला धक्का 

अचानक लग्न करून सारंग आणि पॉला यांनी चाहत्यांना धक्का दिला आहे. दोघांनी कॅनडामध्ये २८ सप्टेंबरमध्ये लग्न केलं आहे. सारंगने लग्नाचे काही फोटो शेअर केलं असून त्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यानं लिहिलेल्या पोस्टमध्ये आपली भावना व्यक्त केली आहे. त्यानं पोस्टमध्ये पॉलाबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सारंगने पोस्टमध्ये काय लिहिलं? 

सारंग पोस्टमध्ये लिहितो की, हो, आम्ही लग्न केलंय! तुम्हा सर्वांना माहीत आहे की लग्न हे आमच्यासाठी कधीच प्राधान्य नव्हतं. पण आम्हाला वेगळं करू शकेल अशी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे एक कागदाची शीट." त्यानंतर पुढं बोलताना त्यानं मन मोकळं केलं. तो लिहितो की, “गेलं वर्ष खूप कठीण होतं. जगभर संघर्ष सुरू होता. द्वेष इतका वाढला होता की पहिल्यांदाच आम्हाला वेगळं होण्याची भीती वाटली. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं.”

लग्न वैयक्तिक पातळीवर पार पडलं 

सारंग आणि पॉला या दोघांचे लग्न वैयक्तिक पातळीवर पार पडले. ते पुढं म्हणतात की, "आमचं प्रेम आणि मैत्री जपण्यासाठी आम्ही काल म्हणजेच 28/09/2025 रोजी तो कागद घेतला. आमचं लग्न अगदी वैयक्तिक पातळीवर पार पडलं." "आमचं जवळचं कुटुंब आणि काही मित्र-मैत्रिणी Deep Cove मधल्या आमच्या आवडत्या झाडाखाली जमले… आणि हा क्षण आमच्या कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी परफेक्ट ठरला."

प्रेम नेहमीच जिंकत असतं 

"आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि आयुष्यभर प्रियकर-प्रेयसी आणि सर्वात जवळचे मित्र राहण्याची शपथ घेतली. हीच आमची छोटीशी कहाणी! प्रेम नेहमीच जिंकणार" असं सारंगने म्हटलं आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kajol Durga Puja : लाल-सोनेरी साडीत काजोलचा जलवा, मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेचे पाहा खास फोटोज
Jailer 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'जेलर 2'ची धूम, पहिल्याच दिवशी रजनीकांत यांची सेंच्युरी!