Entertainment: भारतातील टॉप 5 श्रीमंत संगीतकार, एकाच्या संपत्तीत बनतील 12 सिनेमे!

Published : Jun 23, 2026, 09:10 PM IST

Entertainment: नुकत्याच झालेल्या जागतिक संगीत दिनानिमित्ताने भारतातले सगळ्यात श्रीमंत संगीत दिग्दर्शक कोण आहेत? त्यांची कमाई कुठून होते? भारतीय संगीत क्षेत्राचं भविष्य कसं आहे? जाणून घ्या सविस्तर 

PREV
16
देशातील सर्वात श्रीमंत संगीत दिग्दर्शक
भारतीय संगीताने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याला कारणीभूत असलेल्या प्रतिभावान संगीत दिग्दर्शकांनी केवळ अप्रतिम संगीतच दिलं नाही, तर कोट्यवधींची संपत्तीही कमावली आहे. जागतिक संगीत दिन 2026 निमित्त, चला भारतातील टॉप 5 श्रीमंत संगीत दिग्दर्शकांविषयी जाणून घेऊया.
26
1. ए.आर. रहमान
ए. आर. रहमान हे भारतातील सर्वात लोकप्रिय संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना जबरदस्त संगीत दिलं आहे. देशातील श्रीमंत संगीत दिग्दर्शकांच्या यादीत रहमान पहिल्या क्रमांकावर आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 2000 कोटी रुपये आहे.
36
2. प्रीतम चक्रवर्ती
प्रीतम चक्रवर्ती हे नावही संगीत विश्वात खूप प्रसिद्ध आहे. प्रीतम यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांना संगीत दिलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ते सुमारे 250 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
46
3. हिमेश रेशमिया
हिमेश रेशमिया हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना संगीत देणाऱ्या हिमेश यांच्याकडे सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
56
4. अमित त्रिवेदी
संगीत विश्वात अमित त्रिवेदी हे एक मोठं नाव आहे. अमित यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास, ते सुमारे 70-80 कोटी रुपयांचे मालक आहेत.
66
5. अनिरुद्ध रविचंदर
अनिरुद्ध रविचंदर हे सध्या संगीत विश्वातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. दक्षिण भारतातील बहुतेक चित्रपटांमध्ये अनिरुद्ध यांचंच संगीत ऐकायला मिळतं. ते सुमारे 50-60 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories