Marathi

World Music Day : इंडियन आयडलचा पहिला विजेता सध्या काय करतोय?

Marathi

इंडियन आयडलचा पहिला विजेता

म्युझिक रिअ‍ॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ 2004-2005 चा पहिला विजेता म्हणून अभिजत सावंतला गौरवण्यात आले होते.

Image credits: Instagram
Marathi

अभिजित सावंतच्या आवाजाची जादू

अभिजित सावंतच्या सुमधूर गाण्याने नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. इंडियन आयडलच्या शो मध्ये जिंकल्यानंतर अभिजित अन्य काही रिअ‍ॅलिटी शो मध्ये देखील झळकला.

Image credits: Instagram
Marathi

अभिजित सावंतचा पहिला अल्बम

इंडियन आडयलनंतर वर्ष 2005 मध्ये अभिजित सावंतचा पहिला सोलो अल्बम 'आपका अभिजित सावंत' काढला. याशिवाय अभिजित सावंतचे 'मोहब्बते लुटाऊंगा' गाण्याने धुमाकूळ घातला होता.

Image credits: Instagram
Marathi

अभिनयात आजमवला हात

वर्ष 2009 मध्ये अभिजित सावंतने लॉटरी सिनेमातून अभिनयात पदार्पणही केले होते. याशिवाय 'तीस मार खा' सिनेमाही लहान भूमिका साकारली होती.

Image credits: Instagram
Marathi

रिअ‍ॅलिटी शो ते राजकरणात एण्ट्री

अभिजित सावंतने इंडियन आयडल सीझन-5 चे सूत्रसंचालन केले होते. याशिवाय अभिजित सावंतने शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता.

Image credits: Instagram
Marathi

सध्या काय करतोय अभिजित सावंत?

सध्या अभिजित सावंत काही इवेंट्समध्ये आपल्या दमदार परफॉर्मेन्सने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतोय. अभिजतचा नुकताच एक इवेंट स्पेनमध्ये झाल्याचा व्हिडीओ त्याने शेअर केलाय.

Image credits: Instagram

बॉलिवूडमधील हे 12 सिनेमे गाण्यांनीच भरलेत, एकात तर 72 Songs

'Yoga Se Hi Hoga', बॉलिवूडमधील 10 अभिनेत्रींच्या तारुण्याचा मंत्रा

वडिलांच्या घरी सोनाक्षीच्या लग्नाच्या विधी होणार नाहीत? वाचा कारण

दोन मुलं होऊ द्या...सोनाक्षी-जहीरच्या लग्नावर स्वराने मारला टोमणा