Entertainment: प्रियांका चोप्रा जेव्हा अमेरिकेत गेली, तेव्हा तिथले स्टुडिओ भारतीय अभिनेत्रींना फक्त छोट्या किंवा सहाय्यक भूमिका देत होते. पण प्रियांकाला साईड रोल नको होता, तर कथेला पुढे नेणारी मुख्य अभिनेत्रीची भूमिका हवी होती.
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) आज जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ती केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर एक यशस्वी निर्माती आणि उद्योजिका म्हणूनही पुढे आली आहे. 'कान्स लायन्स'च्या मंचावर तिने हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची कहाणी सांगितली.
27
चित्रपट निर्मितीत का उतरली?
प्रियांका चोप्राने सांगितले की, "जेव्हा मी अमेरिकेत आले, तेव्हा मला मुख्य भूमिकेत (Lead Role) काम करायचं होतं. पण हॉलिवूडमधील अनेक स्टुडिओंना वाटत होतं की, एखादी भारतीय अभिनेत्री मुख्य भूमिका करू शकत नाही. त्यामुळे मला स्वतःच चित्रपट निर्मितीमध्ये उतरावे लागले."
37
...आपल्यालाच नवे मार्ग शोधावे लागतात
चित्रपटसृष्टीत नकार पचवणं ही सामान्य गोष्ट आहे. पण प्रियांकासाठी नकार हीच यशाची पहिली पायरी ठरली. ती म्हणते, "मी खूप महत्त्वाकांक्षी आहे. जर कोणी मला 'हे शक्य नाही' किंवा 'नको' म्हणाले, तर ते करून दाखवण्याचा माझा हट्ट आणखी वाढतो. मनोरंजन क्षेत्रात महिलांसाठी एक अदृश्य मर्यादा (Glass ceiling) असते, ती ओलांडण्यासाठी आपल्यालाच नवे मार्ग शोधावे लागतात."
करिअरच्या सुरुवातीला आपण नेहमी 'परफेक्ट' (Perfection) राहण्याचा प्रयत्न करायचो, असं प्रियांकाने कबूल केलं. पण आता तिचा दृष्टिकोन बदलला आहे. ती म्हणते, "मी एक माणूस आहे आणि माझ्याकडूनही चुका होतात."
57
चुका मान्य करा
प्रियांका पुढे म्हणाली, "प्रेक्षकांशी भावनिक नातं तेव्हाच तयार होतं, जेव्हा आपण आपल्या चुका मान्य करतो. मी माझ्या परीने सर्वोत्तम काम करत आहे, हे सत्यच मला माझ्या चाहत्यांशी जोडतं."
67
स्वतःचं प्रोडक्शन हाऊस
स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलेल्या प्रियांकाचं ध्येय नव्या कलाकारांना संधी देण्याचं आहे. ती म्हणाली, "मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. आता नवीन कलाकार येतात, तेव्हा त्यांना आधार देण्याची माझी इच्छा आहे. मी एक व्यासपीठ तयार केलं आहे, ज्याद्वारे इतरांनी पुढे यावं, अशी माझी इच्छा आहे."
77
सध्याचे प्रोजेक्टस्
सध्या प्रियांका एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती 'रिसेट' (Reset) नावाच्या एका सर्व्हायव्हल थ्रिलरमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती हॉलिवूड अभिनेता ऑर्लॅंडो ब्लूमसोबत मुख्य भूमिकेत असेल. या सिनेमाचं शूटिंग ऑगस्टपासून सुरू होणार आहे. प्रियांकाचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.