
Disney+ Hotstar has stopped working in India: दुपारपासून भारतात Disney+ Hotstar ने काम करणे बंद केले आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांना त्रास होत आहे. लोकांनी या समस्येबाबत सोशल मीडियावर तक्रारी केल्या आहेत. लोक मोबाईल, वेब आणि स्मार्ट टीव्हीवर हे वापरतात, पण सध्या वेब आणि मोठ्या स्क्रीनवर हे नीट चालत नाहीये. वापरकर्त्यांना स्क्रीनवर मेसेज दिसत आहे: "काहीतरी चूक झाली आहे, सध्या हा व्हिडिओ चालवण्यास त्रास होत आहे." याशिवाय अकाउंट पुन्हा सक्रिय करण्यासाठी किंवा मदत घेण्याचा पर्यायही दिला जात आहे.